झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | zade lava zade jagva marathi nibandh

zade lava zade jagva marathi nibandh

zade lava zade jagva marathi nibandh :- नमस्कार मित्रांनो आज आपण झाडे लावा झाडे जगवा या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

या लेखात वृक्षारोपण करण्याचे फायदे काय आहेत? झाडांमुळे आपल्याला कोणते फायदे होतात याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | zade lava zade jagva marathi nibandh

 

मनुष्य आणि निसर्ग यांचे खूप जवळचे नाते आहे. मनुष्य जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी निसर्गामधून मनुष्याला प्राप्त होतात.

आपल्या सभोवताली असणारी झाडे ही निसर्गाचे सौंदर्य वाढवत असतात.

पक्षी, प्राणी हे निसर्गावरच अवलंबून असतात. झाडांचे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे.

अनेक ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता पहायला मिळत असते. अनेक भागात दुष्काळी परिस्थितीला लोकांना तोंड द्यावे लागते.

वृक्ष कार्बन डायऑ स्वतःकडे घेतात व आपल्याला जीवनावश्यक असणारा प्राणवायू प्रदान करतात. झाडे नेहमी आपल्याला मदत करतात त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

झाडे आपल्याला सावली व गारवा देतात व आपले तप्त उन्हापासून संरक्षण करतात. (झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी)

आपल्यासमोर अनेक प्रदूषणाच्या समस्या उभ्या आहेत. झाडे हवा, जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मदत करतात.

आपल्याला निरोगी राहण्यासाठी स्वछ हवेची गरज असते.

हवेमध्ये वेगवेगळे वायू मिसळल्याने हवा प्रदूषित होते. वृक्ष ही प्रदूषित हवा शुद्ध  करण्याचे काम करतात व आपल्याला स्वछ हवा देतात.

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी

संत, समाजसुधारक यांनी नेहमी वृक्षांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

झाडे ही निसर्गाचा सर्वात महत्वाचा घटक आहेत. झाडांमुळे मनुष्याला नेहमी फायदाच झालेला आहे.(zade lava desh vachava marathi nibandh)

झाडे पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात. ज्या भागात झाडांची संख्या जास्त आहे त्या भागात पाऊस जास्त प्रमाणात पडतो.

आपल्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जायचे नसेल तर झाडांचे महत्व समजून घेऊन वृक्षारोपण करून झाडांची संख्या वाढवली पाहिजे.

एखादे वृक्ष लावून ते वृक्ष मोठे करण्यात खूप वर्षांचा कालावधी लागतो. त्याचे संगोपन करावे लागते परंतु तेच झाड तोडायचे झाले तर काही क्षण पुरेशे असतात. त्यामुळे झाडांचे महत्व आपण समजून घेतले पाहिजे.

झाडे आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करतात. औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींचा उपयोग करून वेगवेगळ्या आजारांवर औषधे उपलब्ध केली जातात. झाडांमुळे मातीची होणारी धूप कमी प्रमाणात होते.

झाडांची संख्या कमी झाली तर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

झाडांपासून आपल्याला नेहमी फायदाच होतो तरीही वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे वृक्षतोड होताना आपल्याला पाहायला मिळते.

झाडांची संख्या कमी झाली तर आपल्याला तप्त उन्हात विसावा घेण्यासाठी सावली शोधावी लागेल. वेगवेगळ्या झाडांपासून उपलब्ध होणारी औषधी आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध होणार नाही.

जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक पक्षी व प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. आपण अनके प्रदूषणाच्या समस्यांचा सामना करत आहोत.(zade lava zade jagva marathi nibandh)

झाडांची संख्या कमी झाली तर जागतिक तापमान वाढ, हवा प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहतील.

या सर्व समस्यांपासून लांब राहायचे असेल तर झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे खूप गरजेचे आहे.

झाडे लावा देश वाचवा निबंध मराठी | zade lava desh vachava marathi nibandh

आपण झाडांचे महत्व समजून घेऊन वृक्षारोपण करण्याकडे भर दिला पाहिजे.

देशात अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये आपण सहभागी झाले पाहिजे.

निसर्गचक्र नीट ठेवण्याचे असेल तर झाडांची संख्या कमी होऊन चालणार नाही. अलीकडे वृक्षारोपणाचे अनके कार्यक्रम आयोजित केले जातात.

झाडे लावणे जेवढे गरजेचे तेवढेच त्यांचे संगोपन करणे देखील गरजेचे आहे. आपण इतरांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. झाडांचे रक्षण आपण केले पाहिजे.

पर्यावरणाचे संतुलन नीट ठेवण्यासाठी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे खूप गरजेचे आहे.

शाळा , कॉलेजमध्ये भेट देऊन झाडांचे महत्व पडून दिले पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवला पाहिजे.

झाडे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात मदत करतात त्यामुळे आपणही झाडांचे रक्षण केले पाहिजे.

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांचे रक्षण करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली पाहिजे. आपण स्वतः वृक्षारोपण करू व त्या झाडांचे संगोपन करू.

तर मित्रांनो तुम्हाला “झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी ”हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ zade lava zade jagva marathi nibandh निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top