झाडांचे महत्व काय आहे? झाडांपासून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळत असतात? झाडांमुळे प्रदूषण कशा प्रकारे कमी होते? झाडांची संख्या कमी झाली तर कोणत्या समस्या उत्पन्न होतील याचा विचार आपण या निबंधामध्ये करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | zade lava desh vachava nibandh in marathi
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
संत तुकाराम महाराज यांनी अशा सुंदर शब्दात निसर्गाशी नाते सांगितले आहे. मनुष्य आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. आपल्या आजूबाजूला असणारी झाडे ही निसर्गाची शोभा वाढवत असतात.
आपल्या आजूबाजूला असणारे हे वृक्ष वातावरणातील कार्बन डाइऑक्साइड शोषून घेतात व आपल्याला जीवनावश्यक असलेला अक्सिजन प्रदान करतात. वातावरणातील हवा शुद्ध करण्याचे काम वृक्ष करत असतात व आपल्याला अनेक श्वसनाच्या आजारांपासून सुरक्षित ठेवतात.
झाडे पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात. ज्या भागात वृक्षांची संख्या जास्त आहे तिथे पाऊस जास्त पडतो.
औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांपासून आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर औषधे उपलब्ध होतात. निसर्गामधून आपल्याला असंख्य गोष्टी मिळत असतात त्यामुळे आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.वृक्ष आपल्याला एवढ्या गोष्टी देत असतात त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
एखादे वृक्ष लावण्यासाठी व त्यांचे पालनपोषण करून ते मोठे होण्यासाठी भरपूर वर्षांचा कालावधी लागतो परंतू ते वृक्ष तोडण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. हे निसर्गचक्र व्यवस्थित चालण्यासाठी वृक्षांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
👉निसर्ग आपला मित्र हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, पाऊस कमी प्रमाणात पडणे अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. पाऊस न पडल्यामुळे आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. हवेमधील विषारी वायूंमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपल्याला पर्यावरणाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
आपल्याला पर्यावरण संतुलन व्यवस्थित ठेवायचे असेन तर वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे. वृक्षांची संख्या वाढवणे खूप महत्वाचे आहे. वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणा वाढले आहे. त्याच्यामुळे बरेच आजार आपल्याला होत आहेत. श्वास घेण्यास शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही.
वृक्षारोपण करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच गरजेचे ते लावलेले वृक्ष जपणे त्यांचे संगोपन आहे. पाण्याअभावी अनेक झाडे सुकून जातात त्यामुळे आपल्याला त्यांचे पालनपोषण सुद्धा करावे लागेल.
झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | zade lava desh vachava nibandh in marathi
आपल्याला शक्य होईल तेवढे वृक्ष आपण लावले पाहिजेत. निसर्गचक्र असेच व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या घराजवळ, रस्त्यांच्या कडेला आपल्याला शक्य होईल तिथे झाडे लावली पाहिजेत. वृक्ष संवर्धनासाठी अनेक अभियान राबविण्यात येतात. एखादी गोष्ट लोकसहभागातून पूर्ण होते. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
शाळांमध्ये, कॉलेजमध्ये वृक्षरोपणाचे कार्यक्रम आयोजित केले तर लहान मुलांना वृक्षांचे महत्व समजेल. प्रत्येकाला निसर्गरम्य ठिकाणी भेट द्यायला आवडत असते. आपण त्या ठिकाणी एखादे झाड लावून तेथील सुंदरतेमध्ये आणखी भर घालू शकतो.
जागतिक तापमानवाढ अशा परिस्थितीत आपल्याला झाडे लावणे खूप महत्वाचे आहे. झाडे लावा झाडे जगवा असे आपण अनेक ठिकाणी ऐकले असेलच. आपण जर आतापासूनच वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन केले नाही तर सर्वांचे अस्तित्वच धोक्यात येईल.
आपण जर प्रत्येकाने एक जरी झाड लावले तरी आपला निसर्ग हिरव्यागार होऊन जाईल, आपल्याला स्वछ हवा मिळेल व आपली पुढील पिढी अनके समस्यापासून सुरक्षित राहील.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘एकतरी झाड लावू !’ वृक्षारोपण करणे व त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाडांचे महत्व समजून घेऊन आपण वृक्षरोपण करण्यासाठी इतरांना प्रेरित केले पाहिजे.
आपण लावलेली झाडे आपल्याला फळे फुले देतील व आपल्याला सावलीही प्रदान करतील तसेच आपल्या पुढील पिढीला स्वछ वातावरण देतील.
तर मित्रांनो तुम्हाला “झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | zade lava desh vachava nibandh in marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.