वाचाल तर वाचाल मराठी निबंध | vachal tar vachal nibandh marathi

vachal tar vachal nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण वाचाल तर वाचाल मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आपण वाचन का केले पाहिजे? वाचन करण्याचे फायदे काय आहेत? वाचन करणे का गरजेचे आहे? अशा भरपूर प्रश्नांची उत्तरे आपण या निबंधामधून पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करूया.

 

वाचाल तर वाचाल मराठी निबंध | vachal tar vachal nibandh marathi

 

 

वाचाल तर वाचाल ,

ज्ञान मिळवाल तर यशस्वी व्हाल.

वाचाल तर वाचाल ह्या वाक्यातच आपल्याला वाचनाचे महत्व समजून जाते. जर आपल्याकडे ज्ञानाचा अमूल्य खजिना असेल तर यश आपल्यापासून दूर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा “वाचाल तर वाचाल” हा अमूल्य विचार आपल्या सर्वानासाठीच अतिशय मोलाचा आहे.

ज्ञान आणि वाचन यांचे नाते जवळचे. जर ज्ञान मिळवायचे असेल तर आपल्याला वाचन करणे गरजेचे आहे. आपल्याला ह्या स्पर्धात्मक जगात ज्ञान मिळवून यशस्वी होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज असते. वाचनाच्या सवयीमुळे माणसाचे आयुष्य घडत असते. आताच्या आधुनिक जगात ज्ञान मिळवण्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत त्यामध्ये वाचन हे एक महत्वाचे साधन.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – निसर्ग आपला मित्र निबंध मराठी

वाचन आपल्यापासून कधीच वेगळे नाही. वाचन आणि माणूस हे एकमेकांचे मित्रच. संपूर्ण जीवन बदलवून टाकण्याची ताकद वाचनामध्ये आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण काही न काही कारणावरून नकळत कितीतरी गोष्टी वाचतो. वाचन करणे ही एक चांगली सवय आहे. आपल्याला वाचन करण्याची आवड असेन तर आपला अमूल्य वेळ वाया न जाता तो वाचनात जातो आणि त्यातून आपण अनेक सुंदर विचार शिकून घेतो.

वाचन करून त्या वाचनामधून ज्ञान मिळवून भरपूर जणांनी आपल्या आयुष्यात यश मिळवले आहे.

वाचाल तर वाचाल मराठी निबंध | vachal tar vachal nibandh marathi

 

वाचनाशी होईल मैत्री,

यशाची मिळेल खात्री.

एखाद्या क्षेत्रात जर यश मिळवायचे असेल तर आपल्याला त्याबद्दल ज्ञान असणे गरजेचे असते आणि हे ज्ञान आपल्याला मिळते ते वाचनातून. वाचनामुळे आपली ज्ञानगंगा भरभरून वाहू लागते. लोकांचा जास्त वेळ कामात आणि  त्यामुळे शालेय जीवनानंतर आपला वाचनाकडचा कल थोडासा कमी होतो.

वाचनामुळे आपण आपले विचार व मुद्दे इतरांना व्यवस्थित समजावून सांगू शकतो. इतरांसाठी संवाद साधू शकतो. वाचनामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते. वाचन केल्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते व ताणतणाव सुद्धा दूर होतो. वाचनाची सवय लहानपणापासून असेल तर त्याचे आपल्या जीवनात होणारे चांगले परिणाम हळू हळू दिसून येतात. आपल्याकडे वाचन करण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी कधीही न संपणारा खजिना उपलब्ध आहे.

प्रत्येक मिनिटाला नवनवीन माहिती उपलब्ध होत असते. ही नवनवीन माहिती अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असते आणि आपण ती माहिती वाचनाच्या माध्यमातून अवगत करत असतो. उत्तम वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये खूप चांगले बदल घडत असतात.

वाचन करण्याने आपली शब्दसमग्री वाढते त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व सुधारते. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते. रोज येणाऱ्या नवनवीन माहितीमध्ये बातम्या , नोकरी , योजना , शैक्षणिक माहिती तसेच जगात नेमकं काय चालले आहे हे आपल्याला समजते. जर आपण ही माहिती वाचत असेन तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणूनच वाचन हे आपल्या आयुष्यात खूप उपयुक्त ठरते.

चला तर मग आजपासून आपल्यापासून सुरवात करू …

 

वाचन करूया
ज्ञान मिळवूया

 

मित्रांनो तुम्ही या निबंधसाठी असेही शीर्षक देऊ शकता-

  • वाचन संस्कृती काळाची गरज निबंध
  • वाचनाचे फायदे मराठी निबंध
  • वाचनाचे महत्व निबंध मराठी

तर मित्रांनो तुम्हाला वाचाल तर वाचाल मराठी निबंध | vachal tar vachal nibandh marathi” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वाचाल तर वाचाल या निबंधा संबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.  वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment