Surya mavala nahi tar nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण सूर्य मावळला नाही तर या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya mavala nahi tar nibandh in marathi
उन्हाळा सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. दुपारची वेळ होती. शाळेतून घरी येत असताना पूर्ण अंग घामाने ओलेचिंब झाले होते. गर्मीने जीव हैराण झाला होता. वातावरणामध्ये उष्णता वाढली होती.
मी लवकरात लवकर घरी आलो. घरात व आजूबाजूच्या परिसरात उन्हाच्या झळा जाणवत होत्या. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही झाली होती. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तर शक्यच न्हवते. किती कडकडीत उन्ह आहे? हा कडकडीत उन्हाळा कधी संपणार? असे अनेक प्रश्न कानावर पडत होते.
घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. अशा वेळी माझ्या मनात एक विचार आला की हा सूर्य मावळलाच नाही तर? सूर्यापासून आपल्याला अमर्यात ऊर्जा प्राप्त होते. सूर्य मावळला नाही तर सर्वत्र प्रकाशच प्रकाश असेल. सूर्य न मावळल्याने अंधार होणार नाही त्यामुळे घरामध्ये होणारा विजेचा वापर कमी होईल व विजेची बचत होईल.
सूर्य मावळला नाही तर किती मज्जा येईल ना. मला दिवसभर खेळता येईल. रात्री होऊ लागली की आई घराकडे येण्यासाठी बोलावणार नाही. माझ्या मनात अनेक प्रश्न घोळू प्रश्न येऊ लागले. सूर्य न मावळल्याने फक्त चांगल्याच गोष्टी घडतील का? त्यामुळे आपल्याला नुकसानही सोसावे लागू शकते का? सूर्य न मावळल्याने कोणत्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो? सूर्य मावळला नाही तर हा विचार करून मला थोडीशी भीती वाटली.
घड्याळ नसते तर मराठी निबंध हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत सूर्य आहे. आपल्याला शरीराला ऊब मिळण्यासाठी सूर्य किरणांचा वापर होतो. सूर्य किरणांमुळे आपली दैनंदिन कामे विनामूल्य पूर्ण होतात. आपल्या शेतातील धान्य वाळवण्यापासून ते आपले कपडे
वाळवण्यापर्यंत सर्व कामे सूर्याच्या किरणांमुळे होतात. आपल्या सर्वांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी सूर्य खूप महत्त्वाचा आहे. सूर्य उगवला की आपल्या दिवसाला सुरुवात होते. आपण सर्व जण आपल्या कामाला निघून जातो. आपल्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करत असतो व सूर्य मावळण्याची वाट बघत असतो.
आपले दिवसभराचे काम आटपून आपण घरी येऊन विश्रांती करतो. दिवसभर कष्ट करून रात्री शांत झोप घेतो. आपल्या सर्व गोष्टी सूर्य उगवण्यावर आणि मावळण्यावर अवलंबून असतात. सूर्य जर मावळला नाही तर आपल्याला दिवसभर कष्ट करावे लागेल. रात्र न झाल्यामुळे निवांत झोप घेता येणार नाही.
आपल्याला उन्हाळा ऋतूमध्येच गर्मी सहन होत नाही मग जर सूर्य मावळलाच नाही तर दिवसभर उन्हाने व गर्मीने खूप खराब अवस्था होईल. सूर्य मावळलाच नाही तर सूर्य उगवणार नाही. सूर्य मावळतीचे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळणार नाही. सूर्योदयाचे पहाटेचे रम्य दृश्य अनुभवता येणार नाही.
सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya mavala nahi tar nibandh in marathi
आपल्याला गर्मी सहन होणार नाही. दिवसभर वातावरण उष्ण राहील त्यामुळे सूर्याची उष्णता असह्य होईल. सूर्य जर नेहमी तळपत राहिला तर पृथ्वीवरील तापमानात वाढ होईल. पाण्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात झाल्यामुळे पृथ्वीवरील जलस्त्रोत कोरडे पडतील व त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल.
मनुष्याला व प्राण्यांना पिण्याच्या पाणी मिळणे कठीण होऊन जाईल.
शेतीसाठी सूर्यकिरणांची आवश्यकता असते. झाडाझुडुपांच्या वाढीसाठी सूर्यकिरण अतिशय गरजेचे आहे. परंतु सूर्य न मावळल्याने अतिउष्णतेमुळे झाडे झुडपे जळून जातील. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचणी निर्माण होतील. शेतकरी शेतीतून पिके घेऊ शकला नाही तर आपल्याला व प्राण्यांना खायला अन्न मिळणे कठीण होऊन जाईल.
सूर्य मावळला नाही तर रात्रीच्या वेळी आकाशातील चंद्र तारे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. सकाळी पक्ष्याचे छान छान आवाज कानावर पडणार नाही. सूर्य न मावळल्याने पक्षी त्यांच्या घरी कसे जाणार?सजीवांना जीवन जगताना अनेक अडचणी येतील. सूर्य जर मावळला नाही तर रात्र होणार नाही त्यामुळे आपल्याला झोप भेटणार नाही आपण सतत कष्ट करत राहू. नीट झोप न मिळाल्यामुळे आपल्या सर्वांचे आरोग्य बिघडायला सुरुवात होईल.
नदी, ओढे, तलाव यातील पाणी कमी झाल्याने जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. पाणी हे सजीवांच्या अस्तित्वासाठी खूप आवश्यक आहे. पाण्याचेच साठे कमी झाले तर जगणेच अवघड होऊन जाईल. झाडांना पाणी न मिळण्यामुळे झाले नष्ट होतील. झाडे वातावरणातील हवा शुद्ध करतात. झाडांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजन चे प्रमाण कमी होईल. झाडांवर खूप पक्षी विसावा करत असतात.
झाडांची फळे खाऊन आपले पोट भरत असतात. झाडेच संपुष्टात आली तर पक्ष्यांचे जगणे कठीण होईल. निसर्गाचे चक्र व्यवस्थित चालू राहणे खूप गरजेचे आहे. निसर्गाने आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या आहेत. आपण सूर्य मावळला नाही तर ही एक कल्पनाच राहू देऊ.
तर मित्रांनो तुम्हाला “सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya mavala nahi tar nibandh marathii हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.