शाळेचे मनोगत निबंध मराठी | Shaleche Manogat Nibandh In Marathi

Shaleche Manogat Nibandh In Marathi नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून शाळेचे मनोगत निबंध मराठी मधून पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

"<yoastmark

 

शाळेचे मनोगत निबंध मराठी

 

नुकत्याच सुट्ट्या संपून शाळा भरली. सर्व मुले एकमेकांना सुट्टीमधील गमतीजमती सांगण्यात मग्न झाले होते.

सगळ्यांना आनंद झाला होता आणि सगळ्यांसोबत मलाही आनंद झाला होता.

मी शाळा बोलतीये. माझे नाव … आहे.

खूप दिवस माझे वर्ग बंद होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा गोंधळ नाही, शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन ऐकायला मिळाले नाही, प्रार्थना नाही पूर्ण शांतता.

परंतु आता मात्र मी पूर्ण भरभरून गेले आहे. प्रार्थना ऐकून माझ्यात उत्साह निर्माण होतो.

शाळेत आल्यावर दंगा, मस्ती करणारी लहान मुले जेव्हा प्रार्थनेसाठी एकदम शिस्तीचे पालन करून प्रार्थना म्हणतात हे पाहून खूप छान वाटते.

तुमच्या अभ्यासाच्या वेळेतून तुम्ही माझ्यासाठी थोडासा वेळ काढून माझ्या अंगणातील स्वच्छता करून माझी निगा राखता हे तर माझ्यासाठी न विसरणारी गोष्ट आहे.

कचरा होऊ नये म्हणून माझ्या प्रत्येक कक्षेत कचरा पेटीचे केलेले नियोजन खूप छान आहे.

वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही यश मिळवून माझ्या काक्ष्यांमधून तसेच माझ्या परिसरामधून आनंदाने मिरवता तेव्हा मलाही तुमच्याबद्दल अभिमान वाटतो.

पावलोपावली तुम्हाला मिळणारे यश मी पाहत असते.Shaleche Manogat Nibandh In Marathi “

वार्षिक परीक्षा, चाचणी परीक्षा, शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्टही मी पाहिले आहे.

दुपारच्या सुट्टीमध्ये झाडांच्या सावलीमध्ये जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्रीतपणने गप्पा मारत जेवण करता हे पाहून माझे मन भरून जाते.

महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याची टाकी सर्वांची तहान भागवत असते. स्वच्छतागृह असल्यामुळे स्वच्छतेचे पालन खूप चांगल्या प्रकारे होते.

Shaleche Manogat Nibandh In Marathi

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला जमलेली गर्दी व त्या दिवशीचे आयोजित केले जाणारे कार्यक्रम खूप छान असतात.

शाळेची तपासणी असेन तर मला सजवले जाते. माझ्या वर्गांना रंग देऊन छान कसे दिसतील हे पहिले जाते.

वर्गांमधील फलकांवर छान छान सुविचार लिहून चांगले विचार दिले जातात. पताका लावल्या जातात.

परंतु कधी कधी वाईट वाटते काही जण माझी काळजी खूप काळजी घेतात आणि काही जण माझ्या भिंतींवर नको त्या रेषा ओढून भिंती खराब करतात.

वर्गांमधील बाकांची काळजी घेतली जात नाही. वर्गांमध्ये ठेवलेल्या कचरपेटीचा वापर न करता कचरा इतरत्र टाकतात.

विध्यार्थी माझ्या वर्गात बसून भरपूर ज्ञान मिळऊन पुढे जाऊन यश मिळवतात.

ह्या वर्षी माझे वर्ग वाढवण्यात आले. नवनवीन बाकांची संख्या वाढवण्यात आली. हे सर्व पाहून मला आनंद झाला.

मी नेहमी तुमच्यासाठी व पुढील येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यासाठी अशीच आनंदात उभी राहील.

तर मित्रांना तुम्हाला Shaleche Manogat Nibandh In Marathi  हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ शाळेचे मनोगत या निबंधा बद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top