Pani Hech Jivan Nibandh in Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण पाणी हेच जीवन या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

पाणी हेच जीवन निबंध मराठी
Pani Hech Jivan Nibandh in Marathi:- पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. पाण्याचे आपल्या जीवनात असलेले महत्व निबंधाच्या शिर्षकामधूनच आपल्याला समजते.
आपण एखादे छानसे छोटेसे रोपटे जमिनीत लावतो व त्याला रोज पाणी देतो तेव्हाच ते वाढते फुलते, बहरते व खूप सुंदर दिसायला लागते परंतु आपण त्या रोपट्याला पाणी दिलेच नाही तर ते सुंदर रोप सुकून जाते.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा- वाचाल तर वाचाल मराठी निबंध
जसे वृक्षांचे आहे तसेच आपलेही आहे. प्रत्येक सजीवला जिवंत राहण्यासाठी पाणी हे खूप महत्वाचे आहे. सर्व सजीवांचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे.
पाणी हा मनुष्याला, प्राण्यांना, पक्ष्यांना आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना जगण्यासाठी आवश्यक घटक आहे. जल हे सर्व सजीवांचे आधार आहे.
प्रत्येकजण हा आपापल्या क्षेत्रात मेहनत घेत असतो. कष्ट करून थकलेला मनुष्यच आपल्याला पाण्याचे महत्व सांगू शकतो.
आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याची गरज ही लागतेच. मनुष्य न जेवता काही आठवडे जगू शकतो परंतु पाण्याअभावी मनुष्य सात दिवसांपेक्षा जास्त दिवस जगू शकत नाही.
एखादे वृक्ष पाण्याविना सुकून जाते. फक्त उन्हाळा या ऋतूमध्ये आपल्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्गातील झाडेझुडपे एकदम सुकून जातात यावरूनच पाण्याचे महत्व आपल्याला समजते.
सजीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण हे पुरेशे व योग्य असावे लागते.
पाणी वाचवा
जीवन वाचवा
शरीरातील पाण्याच्या १० टक्क्यांहून जास्त पाणी कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकणार नाही.
पाणी हेच जीवन असे म्हटले जाते कारण पृथ्वीतलावर पिण्याच्या पाण्याचे प्रमाण हे फक्त ३ टक्के एवढे आहे.
पाण्याचे साठे हे मर्यादित आहेत त्यामुळे हे पाणी काटकसरीने व व्यवस्थित पद्धतीने वापरणे गरजेचे आहे.
विहीर, कूपनलिका, तलाव, ओढे, नद्या, पाऊस अशा अनेक स्रोतांमधून आपल्याला पाणी मिळत असते.
Pani Hech Jivan Nibandh in Marathi
आपल्याला दैनंदिन जीवनात वापरासाठी म्हणजे स्वच्छतेसाठी, अंघोळीसाठी कपडे व भांडी धुण्यासाठी पाणी हे अत्यंत गरजेचे असते.

शेती पिकवण्यासाठी, उद्योग धंदे सुरू ठेवण्यासाठी पाणी हे लागतेच. वीज निर्मिती करण्यासाठी पाणी हेच माध्यम आहे.
पाणी हे केवळ आपली तहानच भागवत नाही तर शेतीमध्येही पाण्याची महत्वाची भूमिका असते. आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे धनधान्य पिकवण्यासाठी पाण्याची गरज असते.
शेतीसाठी पाणी नसेन तर शेतकरी धान्य पिकवू शकणार नाही.”पाणी हेच जीवन निबंध मराठी”
औद्योगिक क्षेत्रातही पाणी खूप महत्वाचे आहे.
अलीकडे वृक्षांची संख्या कमी होत आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड केल्यामुळे झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. वृक्षतोडीमुळे पाऊस अनियमितपणे पडत आहे.
बचत पाण्याची, गरज काळाची.
पाऊस कमी पडल्यामुळे व पाणी वापराचे व्यवस्थित नियोजन न केल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते.
पाण्याचे मर्यादित साठे त्यात वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, कमी पाऊस, तापमान वाढ, जलप्रदूषण यामुळे पाण्याची खूप टंचाई आपल्याला जाणवत आहे.
पाण्याचे साठे हे मर्यादित असल्यामुळे ते स्वछ व पिण्यायोग्य असणाऱ्या पाण्याच्या संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे हे आपल्या हातात आहे.
आपण जर पाणी काटकसरीने वापरले तर आपल्याला पाणी टंचाई या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
पाणी हेच जीवन एकदम बरोबर आहे. जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. आपल्या मूलभूत गरजांपैकी पाणी ही सर्वात महत्वाची गरज आहे.
आपल्याला भरपूर ठिकाणी जलप्रदूषण पाहायला मिळते.
जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. पाणी जर जर प्रदुषित झाले तर आपल्या समोर खूप समस्या उभ्या राहतील. प्रदुषित पाणी पिल्यामुळे पोटाचे विकार तसेच अनेक आजार आपल्याला होतील
पाणी हेच जीवन
मनुष्याच्या शरीराला स्वछ पाणी मिळणे खूप महत्वाचे आहे. जलप्रदूषण झाल्यामुळे मनुष्याच्या आरोग्याला धोका निर्माण होतोच त्याचबरोबर जलचर प्राण्याचे जीवनही धोक्यात येते.
‘पाणी हेच जीवन निबंध मराठी’प्रदुषित पाणी पिल्यामुळे अनेक पशु पक्षी यांच्या जिवालाही धोका निर्माण होत आहे.
नको त्या गोष्टी नदीपात्रात सोडल्यामुळे जलप्रदूषणची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आपल्याला जलप्रदूषण थांबवायचे असेन तसेच रोगराई थांबवायची असेन व आपल्याजवळ असलेले पाण्याचे मर्यादित साठे स्वछ ठेवण्यासाठी जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
आपल्याकडे पाणी खूप मर्यादित आहे आणि तेच पाणी जर दूषित झाले तर खूप मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहील.(Pani Hech Jivan Nibandh in Marathi)
आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते. आपण जर हे जलप्रदूषण रोखले तर त्याचा खूप मोठा फायदा सर्व सजीवांना होईल.
आपण आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे.
आपल्याकडून कळत नकळत खूप पाणी वाया जाते. पाणी भरून झाले तरीही पाण्याचे नळ तशेच चालू राहतात त्यामुळे खूप पाणी वाया जाते.
काही ठिकाणी स्वछ व मुबलक पाणी आहे तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हांत वणवण भटकंती करावी लागते.
Pani hech jivan Marathi essay
आपण पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. आपल्याला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाऊसाचे पाणी साठवून ठेवणे खूप गरजेचे आहे
पाणी वाया न जाता ते शेतीसाठी व पिण्यासाठी कसे साठवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे.
आपण वृक्षारोपणाचे महत्व सर्वाना सांगितले पाहिजे व भरपूर प्रमाणात झाडे लावली पाहिजेत.”Pani Hech Jivan Nibandh in Marathi”
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. पाणी साठवण्यासाठी आपण हे पाणी टाक्यांमध्ये, धरणे, डोंगर उतारावर चार खणणे, छोटी छोटी तळी बांधली पाहिजेत.
पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाऊस झाला तरीही काही ठिकाणी पाणीटंचाई भासते असते.
पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेन तेव्हाच त्याची साठवण करणे गरजेचे आहे.
जनजीवन व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे त्यासाठी पाणी बचत करण्याकडे आपण लक्ष्य देणे गरजेचे आहे.
आपण आपल्याला जेवढे होईल तेवढे पाणी जपून वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच पाणीटंचाई ला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही.
पाणी बचतीसाठी आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे.
आपण आपल्या स्वतःच्या घरी पाणी बचत करू शकतो. पाण्याचा वापर झाला की पाण्याचा नळ आपण बंद केला पाहिजे.
पाणी बचतीसाठी नवीन पद्धतीच्या नळांचा वापर केला तर त्यात पाणी कमी जास्त करता येईल व पाणी बचत होईल.
आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढा पाण्याचा पुर्नवापर केला पाहिजे.
आपण जर स्वतःपासून पाणी बचतीसाठी प्रयत्न केले तर लहान मुलेही त्याप्रमाणे प्रयत्न करतील. पाण्याचे महत्व आपण इतरांना पटवून दिले पाहिजेत.
निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या या संपत्तीचा आपण आदर करूया अणि पाणी बचतीसाठी प्रयत्न करूया.
पाणी आहे तरच जीवन आहे.
तर मित्रांनो तुम्हाला “Pani Hech Jivan Nibandh in Marathi” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ पाणी हेच जीवन या संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.