ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध | online shikshan kalachi garaj marathi nibandh

online shikshan kalachi garaj marathi nibandh: नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन शिक्षण काळाची या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध लिहीत असताना ऑनलाईन शिक्षण का गरजेचं आहे, ऑनलाईन शिक्षणाचे फायदे तसेच त्याचे तोटे काय आहेत या सर्व गोष्टींचा विचार आपण करणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध | online shikshan kalachi garaj marath nibandh

 

आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी बनायचे असेन तर शिक्षण हे खूप महत्वाचे आहे. जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूंमुळे भरपूर महिन्यांनापासून वातावरण अस्थिर झाले आहे.

वर्गांमध्ये बसून शिक्षण घेत असताना विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये संवाद होत असायचा परंतु कोरोना संकटामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. कोरोनाचे विषाणूंचा मोठे संकट जगभर असल्यामुळे मुलांना शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेता येत नाहीये.

कोरोना विषाणूमुळे मानवी जीवनात खूप बदल झाले. कोरोनाच्या  संकटामुळे शाळा, कॉलेज, मंदिरे, गर्दीची ठिकाणे भरपूर महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. या जागतिक संकटामुळे काही  काळासाठी शाळा, कॉलेज बंद करत असताना मुलांची काळजी घेणे हे महत्वाचे धैय होते. परंतु शिक्षण थांबवून कसे चालेल? कोरोनाचे संकट जरी असले तरी मुलांचे शिक्षण थांबवून चालणार नाही. शाळा कॉलेज बंद ठेवल्यामुळे मुलांचे जास्त प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

हा निबंधसुद्धा जरूर वाचा – श्रमाचे महत्व निबंध मराठी

शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हा खूप चांगला पर्यायी मार्ग आपल्याकडे आहे. ज्ञान मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उपयोगात आणणे गरजेचे आहे.

कोरोना काळामध्ये ऑनलाईन ज्ञान आपण मिळवू शकतो. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग खूप वाढताना आपल्याला पहायला मिळत आहे सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे.ऑनलाईन शिक्षण का गरजेचे आहे हे आपल्याला या कोविड१९ च्या काळात समजण्यास मदत झाली. वेगवेगळ्या माध्यमातून विध्यार्थी हवे ते ज्ञान मिळवू शकतात.

डिजिटल माध्यमांच्या द्वारे एकमेकांकडून ज्ञानाची देवाण घेवाण करू शकतात. आपल्याला शिकताना येणाऱ्या अडचणी एकमेकांना सांगून त्याचे उत्तर मिळवू शकतात.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध | online shikshan kalachi garaj marathi nibandh

कोरोना काळामध्ये भरपूर ऑनलाईन वर्ग सुरू करून शिक्षकांनी विद्ययार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना ज्ञान दिले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शिक्षकांनी भरपूर प्रयत्न केले. ऑनलाईन पद्धतीमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संपर्क साधता आला आणि त्या बरोबर पालकांशी ही संपर्क साधने सोपे झाले.

वेळोवेळी ऑनलाईन माध्यमांच्याद्वारे  मीटिंग घेऊन पालकांना विद्यार्थ्यांची प्रगती सांगता येऊ लागली आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि लॅपटॉप यांचा वापर शिक्षण मिळवण्यासाठी केला तर खूप ज्ञान मिळवू शकतो. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे भरपूर फायदे आहेत.

काही विध्यार्थ्यांना वर्गांमध्ये बसून शिकायला आवडते, काहींना ऑनलाईन माध्यमातून ज्ञान मिळवायला आवडते. ऑनलाईन शिक्षणामुळे आपल्या वेळेची बचत होईल व आपल्याला शिस्त ही लागेल. आपल्याला अभ्यासासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होऊ शकते.

वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भरपूर माहिती मिळते. ऑनलाईन माहितीचा फायदा म्हणजे एखादी गोष्ट समजली नाही तर ती आपण परत परत पाहून ऐकून समजून घेऊ शकतो. ऑनलाईन विडिओ पाहून विध्यार्थी स्वतःच्या नोट्स स्वतः बनवू शकतात. ऑनलाईन शिक्षणाचा फायदा म्हणजे आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही ज्ञान देने सोपे होईल.

पालकांनी जर आपल्या मुलांना वेळेचे नियोजन करून दिले तर ऑनलाईन शिक्षणाचे खूप फायदे होऊ शकतात. पालनकांचेही मुलांवर लक्ष राहते. पालकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करून मोबाइल मध्ये शिक्षणसंबंधी विडिओ टाकून दिल्या तर मुलांना शिकण्यात आवड निर्माण होईल.

ऑनलाईन शिक्षण घेत असताना पालकांनी मुलांची काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे. जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर झाला तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो त्यासाठी पालकांनी मुलांना वेळेचे नियोजन करून देणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना शिक्षणात आवड निर्माण होते त्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

तर मित्रांना तुम्हाला ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध | online shikshan kalachi garaj marathinibandh हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ ऑनलाईन शिक्षण काळाची या निबंधा बद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment