निसर्ग आपला मित्र निबंध मराठी | Nisarg apla mitra nibandh marathi

Nisarg apla mitra nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण निसर्ग आपला मित्र या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

हा निबंध लिहीत असताना निसर्गाचे आपल्या जीवनात असलेले महत्व, निसर्गाची काळजी आपण कशा प्रकारे घेऊ शकतो या गोष्टींचा विचार करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

निसर्ग आपला मित्र निबंध मराठी | Nisarg apla mitra nibandh in marathi

 

प्रत्येकाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडते. आपला खूप वेळ हा निसर्गाच्या सानिध्यात जातो त्यामुळे निसर्गाला आपण आपले मित्रच मानेल पाहिजे. निसर्गाशिवाय आपले अस्तित्व टिकून राहणे अतिशय अवघड आहे. आपल्याला जगण्यासाठी अतिशय आवश्यक असणारे अन्न,पाणी हा निसर्गच आपल्याला देत असतो.

निसर्ग हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या आजूबाजूला असणारे डोंगर, नदी, ओढे, झाडेझुडपे यांचे एकत्रित संगम आपल्याला निसर्गात पाहायला मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात मनुष्य आनंदी आहेत त्यासोबतच पक्षी प्राणीही आनंदात राहतात. निसर्ग पक्ष्यांच्या उदरनिर्वाहासाठी फळे फुले यांची सोय करत असतो.

या निसर्गाच्या सानिध्यात राहून मनुष्याने आपली प्रगती केली. नवनवीन गोष्टींचा शोध मानवाने लावला. निसर्गामुळे मनुष्याच्या जीवनात खूप चांगले बदल घडत गेले. निसर्गाने मानवाला पावलोपावली मदतच केली आहे. मनुष्याला प्रगती करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वस्तू या निसर्गाने नेहमीच प्रदान केल्या आहेत.

निसर्ग ही देवाने आपल्याला दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे. निसर्गामुळे पृथ्वीवर मनुष्य अगदी आनंदाने जीवन जगत आहे.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – माझा आवडता छंद निबंध मराठी

आपण फक्त कल्पना करू की हा निसर्गच नसेन तर? आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींशिवाय  आपले जीवन केवळ अश्यकच आहे.

निसर्ग आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता असंख्य गोष्टी प्रदान करत असतो. आपले निसर्गाशी नाते खूप जवळचे आहे. आपण याच निसर्गाच्या सानिध्यात जन्म घेतो, मोठे होतो व इथेच विलीनही होतो. आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कितीतरी गोष्टी निसर्ग आपल्याला देत असतो.

आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. हे वृक्ष वातावरणातील कार्बन डायाक्साईड स्वतःकडे शोषून घेतात वआपल्याला जीवनावश्यक असा ऑक्सिजन प्रदान करतात.

आपल्या आजूबाजूला असलेले वृक्ष आपल्याला फळे, फुले व इंधने देतात. पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण हे वृक्ष निर्माण करतात.

निसर्ग आपला मित्र निबंध मराठी | Nisarg apla mitra nibandh in marathi

 

अनेक संतांनी, लेखकांनी आपल्या लेखणीतून निसर्गाचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्गाशी नाते सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।

निसर्ग आपल्याला ज्या गोष्टी प्रदान करतो त्याचा तो कधीही मोबदला मागत नाही. निसर्गापासून आपल्याला खूप गोष्टी प्राप्त होतात. आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर आपला ताणतणाव कमी होतो. आपल्या आजूबाजूला असलेला निसर्ग खूप सुंदर आहे.

निसर्गामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. अनके प्रकारची झाडेझुडपे, प्राणी, पक्षी, पक्ष्यांचे छान छान आवाज अशा अनेक गोष्टींचा आनंद आपल्याला निसर्गात मिळतो. या निसर्गामुळेचे आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंचा आनंद घेता येतो.

आपले आरोग्य नीट राहण्यातही निसर्गाचा मोलाचा वाटा आहे. वेगवेगळ्या आजारांवरील औषधे ही याचा निसर्गामुळे आपल्याला उपलब्ध होऊ लागली. आपल्या आजूबाजूला असलेले झाडांमुळे निसर्गाचा समतोल राहतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण निसर्गातील भरपूर गोष्टींचा उपयोग करतो.

निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे अनेक गोष्टी देतो तरीही निसर्गाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे. अलीकडच्या काळात जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवाप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. योग्य वेळेत आपण या प्रदूषणांवर उपाययोजना केल्या नाहीत तर याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

वाढत्या औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना आपल्याला दिसत आहे. आपल्या आजूबाजूला असणारे हे वृक्ष प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे तापमानात वाढ, पाऊस न पडणे अशा अनके समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.

निसर्गाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. निसर्गाचे संवर्धन होईल अशा कार्यक्रमांचे आपण आयोजन केले पाहिजे.

२८ जुलै या दिवशी विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्याला शक्य होईल तेवढे वृक्ष लावून निसर्गाच्या सुंदरतेत आणखी भर टाकली पाहिजे. आपल्याला नेहमी स्वछ व निसर्गरम्य ठिकाणी वास्तव करायला आवडते. त्यासाठी आपण प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आपण खालील उपाय करू शकतो

  • केरकचरा इतरत्र न टाकता तो कचरपेटीमध्ये टाकला पाहिजे.
  • प्लॅस्टिचा वापर कमी करावा.
  • अनावश्यक वस्तू नदीमध्ये टाकू नये. जलप्रदूषण कमी प्रमाणात होईल याची काळजी घ्यावी.
  • वृक्षारोपण करावे.

तर मित्रांनो तुम्हाला निसर्ग आपला मित्र निबंध मराठी | Nisarg apla mitra nibandh marathi हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment