मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध | mobile shap ki vardan nibandh in marathi

mobile shap ki vardan nibandh in marathi

mobile shap ki vardan nibandh in marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

हा निबंध लिहीत असताना मोबाईल वापरण्याचे फायदे काय आहेत? मोबाइलमुळे कोणत्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या झाल्या आहेत? मोबाईलचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने कोणते परिणाम होतील? याची माहिती पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध | mobile shap ki vardan nibandh in marathi

 

मोबाईल हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. मनुष्याने लावलेल्या शोधांपैकी मोबाइल हा सर्वात महान शोध आहे. मोबाईल हे संपर्काचे उत्तम साधन आहे. मोबाइल नसेल तर आपली बरीच कामे अडकून पडतात. मोबाइल हा सर्वांच्याच गरजेचा बनलेला आहे.

👉मोबाईल बंद झाले तर मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा  👈

मोबाईलशिवाय राहणे अवघड झाले आहे. आपण इतरांशी त्वरित संपर्क साधू शकत असल्याने आपली कामे लवकर होतात व आपल्या कामांचा वेगही वाढला.

रेल्वे, सिनेमा, विमान यांची तिकिटे मोबाईलमुळे आपण घरबसल्या मिळवू शकलो. मोबाईलमध्ये आपण गाणी, सिनेमा पाहून काही वेळ आपले मनोरंजन करू शकतो.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बऱ्यापैकी मोबाईलचा वापर होताना आपल्याला पहायला मिळतो. मोबाईलमुळे एकमेकांच्या संपर्कात राहणे शक्य झाले आहे. मोबाईलमध्ये असलेल्या कॅल्क्युलेटरचा उपयोग करून मोठमोठे हिशोब अगदी सहज करू शकतो.

कोरोना काळात शाळा बंद असताना मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने ज्ञान मिळत होते त्यामध्ये मोबाईलचा उपयोग मुलांना झाला. मोबाईलमध्ये असलेल्या कॅमेऱ्याचा उपयोग करून लोक आपले व इतरांचे फोटो काढू लागले.“mobile shap ki vardan nibandh in marathi”

एखादी गोष्ट आवडली तर त्याचे फोटो घेऊन मोबाइल मध्ये सेव  करता येतात. आता विध्यार्थी मोबाईल व इंटरनेटचा उपयोग करून ज्ञान संपादन करू शकतात.

mobile nibandh in marathi

आपल्याला हवी असलेली माहिती, जगभरात चालू असणाऱ्या घडामोडी आपल्याला घरबसल्या मोबाईल व इंटरनेटमुळे मिळत असतात. आपल्या दिवसाची सुरुवात ही मोबाईल मधील अलार्मने होते. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

मोबाईल मुळे आपल्याला सहज आपल्या कुटुंबातील सदस्यांशी, मित्रांशी, नातेवाईकांशी संपर्कात राहणे शक्य झाले आहे. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या बनल्या आहेत. आपण घरबसल्या कोणाशीही संपर्क साधून त्यांच्याशी बातचीत करू शकतो.

मोबाईलचा वापर करून आपण आपल्यापासून दूर असलेल्या आपल्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून पाहू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो.

👉मोबाईल बंद झाले तर मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा  👈

मोबाईल मध्ये अशा गोष्टी असतात ज्याच्या मदतीने आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो. मोबाईलचा उपयोग करून आपण पोलिस, दवाखाने यांच्याशी संपर्क साधू शकतो. घरबसल्या पैशांची देवाणघेवाण करू शकतो त्यासाठी बँकेत जाण्याची गरज पडत नाही.

मोबाईलच्या मदतीने आपण एकमेकांना पैसे पाठवू शकतो व समोरच्याकडून ऑनलाईन माध्यमातून पैसे घेऊही शकतो. आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्याचा मार्ग माहीत नसेल तर मोबाईल मधील गुगल मॅपचा उपयोग करून अगदी सहज आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो.

मोबाईल आपल्या जीवनाचा महत्वाचा घटक बनला आहे. मोबाईल मधील फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, ट्विटर त्यांच्या माध्यमातून आपण एकमेकांना फोटो, माहिती पाठवू शकतो.

मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध | mobile shap ki vardan nibandh in marathi

मोबाईलचे केवळ फायदेच आहेत का?

आपण मोबाईल वापराचे फायदे पाहिले तसेच मोबाइलचा अतिवापर करण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मोबाईलचा अतिवापर होताना आपल्याला पाहायला मिळतो.

नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच मोबाईलचा वापर करण्याचे चांगले व वाईट परिणाम आहेत. मोबाईलच्या वापरामुळे लोक व्यस्त झाले आहेत. घरांमध्ये, मित्रांसोबत असतानाही मोबाईलचा वापर केल्याने एकमेकांशी संवाद कमी होत चालला आहे.

आपण सतत मोबाईलचा वापर करत असतो. गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आपण जास्त मोबाईल मध्ये व्यस्त राहिल्यामुळे आपले इतरत्र लक्ष राहत नाही.(मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध)

मोबाईलचा अतिवापर केल्याने म्हणजेच अधिक गेम्स खेळल्याने, व्हिडीओ पाहिल्याने आपल्याला डोकेदुखी, डोळ्यांना त्रास होऊ शकतो. डॉक्टरदेखील मोबाईलचा अतिवापर कमी करण्याचा सल्ला देतात. मोबाइलचा अतिवापर करण्याचे आरोग्यावर मोठे परिणाम होतात.

मोबाईल मधील गेम्समुळे लहान मुले अभ्यासकडे दुर्लक्ष बराच वेळ गेम्स खेळण्यात घालवतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध

जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर केल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच सोबतच आरोग्याकडेही दुर्लक्ष होत असते. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर वाटते की मोबाइलला शाप तर ठरणार नाही ना.

मोबाईल वापराचे चांगले आणि वाईट परिणाम लक्षात घेऊन आपण मोबाइलचा वापर कसा केला पाहिजे हे स्वतः ठरवले पाहिजे. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

मोबाईलचा शोधामुळे आपण अनेक गोष्टी सहज करू शकतो त्यामुळे मोबाइलचा योग्य प्रमाणात वापर केला तर तो आपल्यासाठी वरदान ठरू शकतो. मोबाईल वापराचे जसे फायदे आहेत तसेच मोबाईल अतिवापर करण्याचे आपल्या आरोग्यावर तसेच अनेक वाईट परिणामदेखील आहेत.

मोबाईलचा वापर गरजेपेक्षा जास्त केला तर त्याच्या वाईट परिणामांमुळे तो आपल्यासाठी शाप ठरू शकतो.(मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध)

तर मित्रांनो तुम्हाला “मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध  हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वरील निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध …. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top