मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi shala boltey nibandh marathi

Mi shala boltey nibandh marathi

Mi shala boltey nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात मी शाळा बोलतेय मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi shala boltey nibandh marathi

 

मी शाळा बोलतेय. मला विद्येचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मुलांना कुटुंबानंतर जीवन जगण्यासाठी आवश्यक ते शिक्षण शाळेतूनच मिळते. माझे नाव … आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत आल्यावर आनंद वाटतो. कोरोना काळात खूप दिवस माझे वर्ग बंद होते. मुलांचा गोंधळ नाही, शिक्षकांचे शिकवणे, रागावणे, समजावून सांगणे नाही सर्वकाही शांत होते.

सर्वांना ज्ञान मिळावे यासाठी मी पुन्हा तयार आहे. मुले शाळेच्या वेळी शाळेत येतात. प्रार्थना ऐकून माझ्यात उत्साह निर्माण होतो. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन, वार्षिक परीक्षा, चाचणी परीक्षा यासाठी तुम्ही घेतलेले कष्टही मी पाहत असते.

👉माझ्या स्वप्नातील शाळा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

माझ्या वर्गाची व्यवस्था खूप चांगली आहे. मुलांना बसण्यासाठी चांगल्या बकांची सोय केलेली आहे व मुलांना शिकवण्यासाठी समोर ब्लॅकबोर्ड बनवला आहे.

या वर्षी मुलांना बसण्यासाठी नवनवीन बाकांची संख्या वाढवण्यात आली हे सर्व पाहून मला आनंद झाला. मला आनंद होतो की विद्यार्थी ज्ञान प्राप्त करण्यासाठी शाळेत येतात आणि जीवनामध्ये यशस्वी होत असतात.

खरंच मला तुमच्या बद्दल अभिमान वाटतो. तुम्ही वर्गखोल्या स्वच्छ ठेवणे, वर्गातील कचरा कचरापेटीमधे टाकून माझी निगा राखता या गोष्टी करता तेव्हा मला खूप छान वाटते.

मी शाळा बोलतेय मराठी निबंध

वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही विजयी होऊन येता तेव्हा मलाही तुमच्याबद्दल अभिमान वाटतो. माझ्या परिसरात वेगवेगळी झाडे लावण्यात आलेली आहेत. मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमांत वृक्षांचे महत्त्व समजावून सांगितले जाते व माझ्या परीसरात वृक्ष लावण्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले जाते.

मुलांना पाणी पिण्यासाठी माझ्या आवारात पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. स्वच्छतागृह असल्यामुळे स्वच्छतेचे पालन खूप चांगल्या प्रकारे होते.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तुमचा उस्ताह पाहण्यासारखा असतो. विद्यार्थी व शिक्षक नियमितपणे आपले कर्तव्य चोख बजावताना मला पहायला मिळते. शाळेची तपासणी असेन तर मला सजवले जाते. माझ्या वर्गांना रंग देऊन छान कसे दिसतील हे पहिले जाते.

वर्गांमधील फलकांवर छान छान सुविचार लिहून चांगले विचार लिहिले जातात. पताका लावल्या जातात.

Mi shala boltey nibandh marathi

गेल्याच वर्षी मला छान रंग दिला होता परंतु काही जण माझ्या भिंतींवर नको त्या रेषा ओढून खराब करतात. स्वच्छतेसाठी माझ्या परिसरात ठेवलेल्या कचरपेटीचा वापर न करता कचरा इतरत्र टाकला जातो.

तुम्हाला शिक्षक, डॉक्टर, अभियंता किंवा काहीही व्हायचे असेल तर मी तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकते. विध्यार्थी माझ्या वर्गात बसून भरपूर ज्ञान मिळवून पुढे जाऊन यश मिळवतात.

👉माझ्या स्वप्नातील शाळा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

परीक्षा संपून सुट्टया सुरू होणार या कल्पनेने तुम्ही विद्यार्थी खुश होत असता परंतू त्यावेळी मी थोडी उदास होते.

प्रशासनाने शाळांच्या व्यवस्थेवर असेच लक्ष ठेवावे जेणेकरून शिक्षणाचा दर्जा सुधारता येईल. मी नेहमी तुमच्यासाठी व पुढील येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अशीच आनंदात उभी राहील.

तर मित्रांनो तुम्हाला “मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi shala boltey nibandh marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मी शाळा बोलतेय मराठी निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top