मी आरसा बोलतोय मराठी निबंध | me arsa boltoy marathi nibandh

me arsa boltoy marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून मी आरसा बोलतोय हा निबंध मराठी मधून पाहणार आहोत.

हा निबंध लिहीत असताना आपण आरशाचा शोध कसा लागला , आरशाचे मानवी जीवनात असलेले महत्व, उपयोग या गोष्टींचा विचार करणार आहोत.

me arsa boltoy marathi nibandh
me arsa boltoy marathi nibandh

मी आरसा बोलतोय मराठी निबंध

 

“Me arsa boltoy marathi nibandh”:-आज सर्व काम आवरून कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी मी निघालो होतो. गडबडीत आरशात स्वताला पाहत असताना मला एक आवाज आला .

क्षणभर मला समजलेच नाही कोण बोलतंय पण जेव्हा मी आरश्याकडे पाहिले तेव्हा मला समजले समोरचा आरसा माझ्याशी बोलत होता.

क्षणभर मी शांतच बसलो.

हे बघ मित्रा मी आरसा बोलतोय. खूप दिवसांपासून मला तुझ्याशी बोलायचं होत पण आज मी तुझ्याशी बोलतोय.

मानावाजवळ अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी आधीपासून होत्या. परंतु स्वतःचे प्रतिबिंब आपण पाहू शकतो हे मानवाला पाण्यामुळे समजले आणि त्यानंतर कालांतराने  माझा जन्म झाला.

मला रूप देऊन सजवण्यात आले. मी तुम्हाला वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहायला मिळतो.

मी केवळ तुम्हाला तुमचे रूप सौंदर्य नाही दाखवत नाही तर त्याबरोबरच तुम्हाला तुमची ओळख करून देण्यास मदत करतो.

तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो.

तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला दाखवतो. मी नेहमी तुम्हाला सत्य दाखवतो. मी तुमच्यात सकारात्मक उर्जा निर्माण करत असतो.

तुला माहीत असेनच? भरपूर ठिकाणी तुझी आणि माझी भेट होत असते.”me arsa boltoy marathi nibandh”

मी कधी तुला घरात भेटतो तर कधी तुझी काळजी घेणासाठी तू मोटार सायकल चालवत असताना तुला मागचे दिसावे म्हणून तुझ्या गाडीवर खंबीरपणे उभा असतो.

तू जेव्हा परीक्षेत, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विजयी होऊन माझ्यासमोर येऊन थांबतोस तेव्हा तुझ्या सोबत मलाही तुझा अभिमान वाटतो.

सर्वजण माझा उपयोग करतात. प्रत्येक घरात मी उपस्थित असतो. प्रत्येक माणूस आपले रूप, सौंदर्य पाहण्यासाठी माझा उपयोग करतो .

माझ्यामध्ये तुम्ही स्वतःचे रूप पाहून खुश होता तेव्हा मलाही खूप आनंद होतो. प्रत्येक माणूस आपण व्यवस्थित दिसावं म्हणून स्वताला आरशात पाहतो.”me arsa boltoy marathi nibandh”

गावच्या जत्रेमध्ये मे विविध रूपांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. मी सर्वत्र असतो.

mi arsa boltoy marathi nibandh

माझा वापर बऱ्याच ठिकाणी होतो हे माहीत असेनच?
शाळांमध्ये प्रयोग शाळेत,वैज्ञानिक प्रयोग शाळेमध्ये, टेलिस्कोपमध्ये, दुर्बिणीनमध्ये मध्ये माझा उपयोग केला जातो.

मी जर नसतो तर काय झाले असते?

तुम्ही कसे दिसता हे तुम्हाला समजले नसते. तुम्ही तुमचे सौंदर्य पाहू शकला नसता. मोटार सायकल चालवत असताना मागेचे पाहू शकला नसता.“मी आरसा बोलतोय मराठी निबंध”

मी नेहमी तुमच्या सर्वांची काळजी घेत असतो.

अपघात होऊ नये म्हणून मी नेहमी तुमच्या सर्वांच्या मोटर सायकल वर मागून येणाऱ्या गाड्यांवर लक्ष्य ठेवण्यास मदत करत असतो.

माझ्यामुळे नेहमी मदतच होईल असे नाही.

माझी जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्हाला इजा होऊ शकते. त्यामुळे मीही तुमची काळजी घेईल आणि तुम्हीही माझी काळजी घ्या.

मी असाच तुमच्या सोबत राहील. मला खूप आनंद झाला आता मी निरोप घेतो. आपण पुन्हा भेटूया!

तर मित्रांना तुम्हाला “me arsa boltoy marathi nibandh (मी आरसा बोलतोय)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मराठी मी आरसा बोलतोय या निबंधाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top