Mazi shala marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून माझी शाळा मराठी निबंध मराठी मधून पाहणार आहोत.
शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर. शाळा आणि विध्यार्थी हे नाते तर खूप जवळचे.
आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेन तर अपल्यालाजवळ ज्ञानाचा साठा असणे गरजेचे आहे.
या स्पर्धात्मक जगात आपल्याला टिकून राहायचे असेल तर आपल्याकडे भरभरून ज्ञान असणे गरजेचे आहे म्हणून हे ज्ञान मिळवण्यासाठी आपले आई वडील आपल्याला शाळेत पाठवतात.
यश मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यात महत्वाचा वाटा आहे तो आपल्या शाळेचा व त्या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा.

माझी शाळा मराठी निबंध
माझ्या शाळेचे नाव_________आहे. माझी शाळा______या गावाच्या मधोमध वसलेली आहे.
इयत्ता पाचवीपासून ते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण माझ्या शाळेत दिले जाते. शाळेतील प्रत्येक वर्गात मुलांना बसण्यासाठी बाकांची सोय केलेली आहे
माझ्या शाळेची रचना खूप सुंदर आहे. माझी शाळा दोन मजली आहे.
माझ्या शाळेचा गणवेश मला खूप आवडतो.
मुलांना शिक्षण घेताना अडचणी होऊ नयेत म्हणून माझ्या शाळेत खूप काळजी घेतली जाते.
माझ्या शाळेला खूप मोठे मैदान लाभलेले आहे.
शाळेतील शिक्षक खूप हुशार असल्यामुळे आम्हाला शिक्षण घेताना अजून आवड निर्माण होते.
मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी साहित्य कमी पडू नये म्हणून शाळेत वाचनालयाची आहे. भरपूर पुस्तकांचा संग्रह वाचनालय मध्ये केलेला आहे.
वाचनालयमध्ये शांतता राखली जाते. मुलांना अधिक चांगले ज्ञान मिळावे म्हणून वाचनालय सोबतच शाळेमध्ये संगणक कक्ष, प्रयोगशाळा यांचीही काळजी घेतलेली आहे.
माझ्या शाळेत शिक्षणनसोबत मैदानी खेळांनाही खूप महत्व दिले जाते. खेळांचे शिक्षण देणायासाठी माझ्या शाळेने उत्तम शिक्षकही निवडून दिले आहेत.
मागच्या वर्षी शाळेतील मुलांनी मैदानी खेळात भरपूर यश मिळवून शाळेचे नाव रोषण केले.
Majhi shala nibandh marathi
शाळेमध्ये दरवर्षी भाषण स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमुळे आमचा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत होते.
शाळेमध्ये दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी खूप आनंदात साजरे केले जातात. या दिवशी भरपूर कार्यक्रम आयोजित केले जातात.
शाळेचा परिसर खूप मोठा असला तरी स्वचतेचा दृष्टीने शाळेने खूप नियोजन केले आहे. प्रत्येक वर्गांमध्ये आणि शाळेच्या परिसरात कचरापेट्या ठेवल्या आहेत.
आम्ही सर्वजण खूप आवडीने शाळेची स्वच्छता ठेवतो.
शाळेमध्ये सुंदर बाग आहे. त्यामध्ये आम्ही मुले खूप मज्जा करत जेवण करतो.
माझ्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व स्वछता गृहही आहेत.
कचऱ्याचे नियोजन, स्वच्छतागृह या गोष्टींमुळे माझ्या शाळेला ——हा पुरस्कार देण्यात आला आहे.
mazi shala nibandh 5th class
शाळेच्या परिसरात खूप झाडे असल्यामुळे दुपारच्या कडक उन्हामध्ये झाडाच्या सावलीमध्ये बसून जेवण करण्याचा आनंद खूप छान असतो.
आमच्या आवडीचे म्हणजे आमच्या शाळेत दरवर्षी सहलीचे नियोजन केले जाते. या सहलीमध्ये आम्ही मुले खूप मज्जा करतो.”Mazi Shala Marathi Nibandh”
माझी शाळा मला खूप अवडते कारण या शाळेमध्येच मला भरभरून ज्ञान मिळाले, चांगले विचार मिळाले व सोबतच चांगले मित्र सुद्धा भेटले आणि याच शाळेमधून मला कधीही न विसरता येतील अशा आठवणी मिळाल्या आहेत.
मला माझ्या शाळेविषयी अभिमान व आदर आहे.
माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा स्वच्छ शाळा!
तर मित्रांना तुम्हाला “Mazi shala marathi nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ माझी शाळा या निबंधा बद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Chan Nibandh aahe
Thanks