{ सुंदर } माझी आई मराठी निबंध | mazi aai nibandh marathi

mazi aai marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखातून माझी आई या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

माझी आई हा निबंध लिहीत असताना आईचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम, कुटुंबविषयी असलेली काळजी, भावना या सर्व गोष्टींचा विचार करणार आहोत.

मित्रांनो, माझी आई निबंध शिक्षक/शिक्षिका परीक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात. परीक्षांमध्ये mazi aai nibandh marathi हा निबंध वारंवार विचारला जातो.

आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी काही मुद्दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

mazi aai marathi nibandh
mazi aai marathi nibandh

माझी आई मराठी निबंध

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. आईबद्दल कितीही सांगितले तरी कमीच.

आपल्याला काही कळत नसते तेव्हापासून ते आपल्याला कळायला लागेपर्यंत आपली आई आपली काळजी घेत असते.

आपल्याला चांगले विचार चांगली शिकवण आपली आई देत असते.

आई म्हणजे माया. आई म्हणजे गुरू.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ कवी यशवंत यांच्या या ओळीचा अर्थ समजला की आपल्या आयुष्यात आई किती महत्वाची आहे हे समजल्याशिवाय राहत नाही.

मला माझ्या पायावर उभे करण्यासाठी म्हणजेच मी यशस्वी होण्यासाठी मेहनत करणारी माझी आई मला खूप आवडते.

माझ्या आईचे नाव हे नंदा आहे. माझ्या आईचा जन्म हा ….या खेडेगावात गावात झाला. माझ्या आईचे वय ४७ वर्ष आहे. माझ्या आईने तिचे शिक्षण याच गावाच्या शाळेमध्ये पूर्ण केले.

मी आता जे काही आहे ते मी माझ्या आईमुळे आहे. आई मला खूप समजून घेत त्यामुळे मला माझ्या मनातील गोष्टी तिला सांगायला खूप आवडतात.

घरची परिस्थिती बिकट असली तरीही माझी आई सर्वाना खुश ठेवते. एखाद्या गोष्टीचे नियोजन कसे करावे ही मी माझ्या आईकडूनच शिकलो.”mazi aai marathi nibandh”

आईमुळे घराला शोभा आहे. लहानपणापासून तिची होणारी धडपड मी पाहत आलो आहे. कुटुंबातील लोकांची आईला फार काळजी.

माझ्या आईने स्वतःसाठी कधीच काही घेतले नाही परंतु मला कधी काही कमी पडू दिले नाही.

पहाटेपासून आईच्या दिवसाची सुरुवात होते. देवपूजा, सर्व जणांचे जेवण बनवून, बाकीची सर्व कामे माझी आई न थकता करत असते.

मी लहान असताना शाळेत जाण्याआधी माझी शाळेची तयारी माझी आईच करून देत असे.

अजूनही आई न थकता मी कामाला निघायच्या आधी माझा डबा तयार करून ठेवते.

जेव्हा मी घरामध्ये पाऊल ठेवतो तेव्हा आई दिसली की खूप समाधान मिळते. आईमुळे घराला घरपण आहे.

mazi aai marathi nibandh

मी कुठे लांब बाहेर जात असेन तेव्हा तिची काळजी मला पाहायला मिळते.

माझ्या आईने माझ्यावर जीव लावता लावता मला शिस्तही लावली. माझ्या आईचे माझ्या अभ्यासाकडे नेहमी लक्ष असायचे.

आईने माझ्यावर नेहमी चांगले संस्कार लावले. जिथे मी योग्य असेन तिथे माझे लाड केले व जिथे मी चुकत असेन तिथे मला समजावले.

माझ्या आईच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी माझ्या आयुष्यात यश मिळवू शकलो.”mazi aai marathi nibandh”

मला माझ्या आईच्या नेहमी अभिमान वाटतो. अवघड परिस्तिथी वर मात कशी मिळवायची हेही माझ्या आईकडूनच मला शिकायला मिळाले.

प्रत्येक यशस्वी लोकांच्या यशामध्ये आईची खूप महत्वाची भूमिका असते. आई आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन करत असते.

कधी मला काही लागले जखम झाली तर माझ्या तोंडात क्षणात नाव येते आई. आईचे प्रेम हे तिच्या मुलासाठी कधीच संपत नाही

आईच्या प्रमाची तुलना करणे हे अशक्य.

माझ्या आईने माझी खूप काळजी घेतली आहे. मला नेहमी प्रेमाने वाढवले आहे. खडतर परिस्तिथी मध्ये मला शिक्षण देऊन माझे आयुष्य नीट करून दिले.’mazi aai marathi nibandh’

mazi aai nibandh marathi
mazi aai nibandh marathi

माझ्या आईने आणि वडिलांनी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले आहेत म्हणून माझी आई माझ्यासाठी आदर्श माझा आहे.

majhi aai marathi nibandh

मला माझ्या आईसोबत राहायला खूप आवडते. मला अभिमान आहे माझ्याकडे माझ्यावर जीव लावण्यासाठी आई आहे.

आईच्या प्रेमाने, मार्गदर्शनाने मी कधी मोठा झालो समजलंच नाही. आता माझ्या आईची तब्बेत पहिल्यापेक्षा थोडी नाजूक झाली आहे. तरीही अजूनही आई संपूर्ण घर सांभाळते.

माझी आई माझ्यासाठी माझा देवच. आईमुळे तर मला हे जग पाहायला मिळाले.(mazi aai marathi nibandh)

मला माझ्या आईची काळजी घ्यायला खूप आवडते.
आई म्हणजे जिव्हाळा. आईचे प्रेम हे दुसरीकडे कुठेही मिळू शकत नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात आई खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. आपले आईवडील स्वतः झिजतात पण आपल्या मुलांना काही कमी पडू देत नाहीत.

माझी आई ही माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची आहे. मी देवाचे नेहमी आभार मानतो कारण त्याने मला एवढी प्रेमळ आई दिली.

आई ही आपल्या आयुष्यातील खूप महत्वाची व्यक्ती आहे. आई घरात एकता निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेत.

आई आपल्या मुलावर जी माया करते त्याची तुलना कोणासोबतच केली जाऊ शकत नाही.

आईमुळे जीवनात आनंद असतो म्हणून आपण आपल्या आईला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

मी नेहमी माझ्या आईच्या आरोग्याची काळजी घेईल आणि आईला दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करेन

तर मित्रांनो तुम्हाला mazi aai marathi nibandh हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ माझी आई या निबंधा बद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top