माझा आवडता पक्षी पोपट वर मराठी निबंध | Maza avadta pakshi popat nibandh marathi

Maza avadta pakshi popat nibandh marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता पक्षी पोपट या विषयावर मराठी निबंध मध्ये पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

माझा आवडता पक्षी पोपट वर मराठी निबंध | Maza avadta pakshi popat nibandh marathi

 

आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळे पक्षी पाहत असतो. आपल्या सर्वांनाच पक्षी खूप आवडतात. पक्षी हे निसर्गाची शोभा वाढवत असतात. निसर्गातील छान छान पक्ष्यांपैकी पोपट हा माझा आवडता पक्षी आहे.  लहानपणापासून मला पोपट पक्षी खुप आवडतो.

आकाशात उडणारा पोपटांचा थवा पहिला तरी खूप छान वाटते. पोपट हा दिसायला अतिशय सुंदर पक्षी आहे. पोपटाला आपण अगदी सहजपणे ओळखू शकतो. पोपटाच्या शरीराची रचना ही मध्यम आकाराचा असते. पोपटाची चोच टोकदार व बाकदार असते. पोपटाची चोच लाल रंगाची असते काही पोपटांची शेपटी लांब तर काहींची आखूड असते. पोपटाची मान ही आखूड व पंख मजबूत असतात.

पोपट हा रंगबेरंगी असल्याने तो सर्वांना आवडतो. पोपट हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रंगात आपल्याला पाहायला मिळतो.

पोपटाचा सामान्य रंग हा हिरवा असतो. आपल्या भारत देशामध्ये आढळून येणारे पोपट हे बहुदा हिरव्या रंगाचे असतात. पोपटाच्या पायाला चार नखे असतात. बाकीच्या देशांमध्ये पोपट हे निळ्या, पिवळ्या, लाल रंगांमध्येही पाहायला मिळतात.

👉श्रमाचे महत्व निबंध मराठी वाचण्यासाठी  येथे क्लिक करा 👈

उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये म्हणजेच उबदार भागात पोपट जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. इंग्रजी भाषेमध्ये पोपटाला Parrot असे म्हंटले जाते. संपूर्ण जगभरात पोपटाच्या ३५० हुन आधी प्रजाती आढळतात. दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये विविध जाती व प्रकार आढळतात.

पोपट का बुद्धिमान पक्षी आहे. काही पोपट फार स्पष्ट आणि माणसासारखे शब्दोच्चार करतात. नमस्कार, राम राम असे बोलून तो पाहुण्यांचे स्वागत करतो.

माणसांची हुबेहूब नक्कल करण्यात पोपट खूप पटाईत असतात. पोपट पक्ष्याच्या अनेक जाती आहेत. पोपट हा झाडांवर राहणे पसंत करतो. पोपटाच्या पायाच्या विशिष्ट रचनेमुळे ते झाडांवर सहज आपला विसावा करू शकतात.

माझा आवडता पक्षी पोपट वर मराठी निबंध | maza avadta pakshi popat nibandhin marathi

पोपट हे झाडांच्या पोकळीत, कपाऱ्यांमध्ये, भिंतींच्या मोठ्या भोकांमध्ये राहतात.  पोपट पक्षी रानावनात, जंगलांमध्ये पाहायला मिळतात.

धान्य, मिरची व झाडांवरील फळे हे पोपटांचे खाद्य. पोपटाजवळ असलेल्या कणखर व धारदार चोचीने ते कठीण कावचीचे फळ अगदी सहज फोडून खाऊ शकतात. पोपट पक्ष्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे तो आपल्या पायांमध्ये अन्न पकडून खातो. पोपटांना फळे खायला खूप आवडतात. अंजीर, डाळिंब, पेरू ही फळे पोपट आवडीने खातात.

पोपट समूहाने राहतात व एकत्रितपणे अन्नाच्या शोधत बाहेर पडतात. मादी पोपट प्रत्येक खेपेस २–५ अंडी घालते. ही अंडी आकाराने लहान व पांढऱ्या रंगाची असतात. सर्वसाधारणपणे तीन आठवड्यानंतर या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात.

भारत देशामध्ये राघू, कीर, तोता या जातीचे पोपट पाहायला मिळतात. राघू जातीचे पोपट हे मोठे वृक्ष  असलेल्या भागात आढळतात. कीर या जातीचे पोपट खेडे गावात, शेतात पाहायला मिळतात. प्रदूषणामुळे व वाढत्या जंगलतोडीमुळे या सुंदर पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. अलीकडे पोपट हा पक्षी क्वचितच पाहायला मिळतो. आधी जे पोपट आपल्याला सहज पाहायला मिळत होते ते आता दिसेनासे झालेत.

पोपट हा पक्षी स्वतंत्रपणे आकाशात उडतानाचा छान वाटतो. आपल्या अजीबाजूचे पक्षी स्वतंत्रपणे उंच भरारी घेताना पाहायला छान वाटते. पोपट व तसेच अनेक पक्षी आपल्या निसर्गाची शोभा आहेत. आपल्याला आपल्या देशातील पक्ष्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “माझा आवडता पक्षी पोपट वर मराठी निबंध | maza avadta pakshi popat nibandh marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ या निबंधा बद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment