माझा आवडता पक्षी मोर वर निबंध मराठी | maza avadta pakshi mor nibandh in marathi

maza avadta pakshi mor nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आपण या लेखातून माझा आवडता पक्षी मोर या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.maza avadta pakshi mor essay in marathi

maza avadta pakshi mor nibandh in marathi
maza avadta pakshi mor nibandh in marathi

 

माझा आवडता पक्षी मोर वर निबंध मराठी

 

नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !

“maza avadta pakshi mor nibandh in marathi”:-मोर म्हटले की आठवते ती ग.दि.माडगूळकर यांची वरील सुंदर कविता.

मला कोणी विचारले तुमचा आवडत पक्षी कोणता ? माझ्या तोंडातून क्षणात उत्तर येते मोर.

कारण मोर हा इतका सुंदर पक्षी आहे त्यामुळे मोर आपल्या सर्वांच्याच आवडीचा आहे.

मोर हा कुकुटवर्गीय पक्षी म्हणून ओळखला जातो. मोरला पिकॉक (peacock) किंवा pea fowl या नावाने सुद्धा ओळखले जाते.

मोराला पक्ष्यांचा राजा असेही म्हटले जाते.

मोर हा अतिशय सुंदर असा पक्षी आहे. या आपल्या आवडीच्या पक्षाचे रूपच असे आहे की त्याला सारखे पाहत राहावे असे वाटते. मोराला पाहिले तरी मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

नर पक्षास मोर तर मादी पक्षाला लांडोर नावाने ओळखले जाते.

मोराच्या डोक्यावर असलेला निळा रंग  व डोक्यावर असलेला तुरा या पक्षाचा रुबाब वाढवत असतो. मानेचा रंग हा  निळा व पाठीवर असलेली वेगवेगळ्या रंगाची पिसे या पक्षाची शोभा वाढवत असतात.

मोराचा ‘मीऊ मीऊ’ आवाज सहज ओळखता येतो. शेतात शांत ठिकाणी हा आवाज खूप सुंदर भासतो. पावसाळ्यातील मोराचे रूप पाहायला आणि आवाज ऐकायला खूप छान वाटते.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा- इंधन बचत निबंध मराठी

मोराचा रंगीत पिसारा व डौलदार मान मोराची सुंदरता वाढवतात.“maza avadta pakshi mor nibandh in marathi

मोर हा अतिशय चपळ पक्षी आहे. मोर अतिशय जागरूक असतो. थोडीशी सुद्धा चाहूल ऐकली तरी झाडाझुडपात गायब होऊन जातो.

मोर हा काही ठिकाणी मनुष्य वस्ती पासून थोडासा दूर तर काही ठिकाणी मनुष्य वस्तीच्या जवळ ओढ्याच्या जवळ, जंगलामध्ये  किंवा झाडीच्या आसपास राहणे पसंत करतो.

maza avadta pakshi mor eassy in marathi

 

मोर हा शेतकऱ्याच्या मित्र आहे असे म्हंटले तरी चालेल.

मोर हा शेतातील किडे, आळी, साप, सरडे अशा गोष्टी खाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतो आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसनापासुन शेतकऱ्यालाही मदत करतो.

किडे, आळी, कीटक यासोबत झाडांची पाने फळेही मोर खातात.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मोराला विशेष स्थान आहे. मोर हे सरस्वती व कार्तिकेय या देवांचे वाहन आहे.

मोराच्या असलेल्या या सुंदरतेमुळे भारत सरकारने २६ जानेवारी १९६३ या मध्ये मोराची राष्ट्रीय पक्षी म्हणून निवड केली.
मोरने पैठणी या महावस्त्रावर आपले स्थान मिळवले आहे.

मोर हा आपल्या सुंदरतेमुळे आपले वेगळेपण जपून आहे.  म्हणून मोर मला खूप आवडतो.

मोर हा सुंदर पक्षी आहे. परंतु मोरांची संख्या दुर्मिळ होत चालली आहे.‘माझा आवडता पक्षी मोर वर निबंध मराठी’

अलीकडच्या काळात शेतामध्ये क्वचित दिसला तरच मोर आपल्याला पाहायला मिळतो. हे सुंदर सुंदर पक्षीच आपल्या देशाची खरी सुंदरता आहेत.

म्हणून आपणच या सुंदर जीवांची काळजी घेऊया आणि आपल्या देशाची ही सुंदरता जपुया.

निष्कर्ष:- मोर हा आपल्या देशातील अतिशय सुंदर पक्षी आहे. आपण मोरांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

तर मित्रांना तुम्हाला “Maza Avadta Pakshi Mor Nibandh In Marathi” (माझा आवडता पक्षी मोर)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ माझा आवडता पक्षी मोर या निबंधा संबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top