माझा आवडता कलावंत/कलाकार मराठी निबंध | Maza avadta kalavant marathi nibandh

Maza avadta kalavant marathi nibandh

Maza avadta kalavant/ kalakar marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता कलावंत/कलाकार या विषयावर निबंध  पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

माझा आवडता कलावंत मराठी निबंध | Maza avadta kalavant marathi nibandh

 

प्रत्येकाची आवड वेगळी असते. कोणाला वाचन आवडते तर कोणाला गायन. कोणाला खेळ चांगले खेळता येतात तर कोणाला लेखन करायला आवडते.

अनेक जण त्यांच्याजवळ असलेल्या कलेचा उपयोग करुन देशासाठी महत्वपूर्ण कार्य करतात.

विष्णु वामन शिरवाडकर, लता मंगेशकर, रवींद्रनाथ टागोर असे अनेक कलावंत आपल्या देशात होऊन गेले.

👉राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी येथे क्लिक करा 👈

माझे आवडते कलावंत विष्णु वामन शिरवाडकर हे आहेत. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते.

माझ्या मराठी मातीचा,

लावा ललाटास टिळा,

हिच्या संगाने जागल्या,

दरयाखोर्यांतील शिळा.

मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे.

भारत सरकारने त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले.’माझा आवडता कलावंत/कलाकार मराठी निबंध’

कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.

लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णु वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते.

माझा आवडता कलावंत मराठी निबंध

कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. ती सर्वांची लाडकी होती. कवी वि. वा. शिरवाडकर यांनी अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ हे नाव धारण केले आहे.

त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘जीवनलहरी’ हा पहिला मराठी कवितासंग्रह  प्रकाशित केला.

त्यांनी  बी.ए. पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयातून पूर्ण केले.  मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले.

👉राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी येथे क्लिक करा 👈

बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे काही काळ अशी कामे केली.

यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

अक्षरबाग, मराठी माती, प्रवासी पक्षी, किनारा, श्रावण, जीवन लहरी इ. त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत.

१९३३ साली जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. कुसुमाग्रज यांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.

त्यांनी सन १९३३ साली ‘ध्रुव मंडळ’ ची स्थापना केली. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. ते मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

कुसुमाग्रज यांनी आपल्या बोलीभाषेत रचलेले कविता संग्रह खूप सुंदर आहेत. कुसुमाग्रज हे महान कवी होते त्याबरोबर एक समाजसुधारक देखील होते.

Maza avadta kalavant marathi nibandh

जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, विशाखा हे त्यांचे काही नावाजलेले साहित्य काव्य संग्रह आहेत.

२७ फेब्रुवारी हा दिवस कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.

कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. तसेच यांच्या अनेक कविता तरुणांनामध्ये स्फूर्ती निर्माण आहेत.

२७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो..

आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. (Maza avadta kalavant/ kalakar marathi nibandh)

मराठी राजभाषा दिनादिवशी अनेक शाळांमध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा कार्यक्रमाचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्व मुलांना सांगितले जाते.

कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेक सामाजिक चळवळीमधे त्यांनी सहभाग घेतला.

अशा महान कवीचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले. कुसुमाग्रज यांच्या यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “माझा आवडता कलावंत/कलाकार मराठी निबंध | Maza avadta kalavant marathi nibandh​”हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ या​ निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments किंवा email करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. Email- pravinynsankpal@gmail.com

आजच्या माझा आवडता कलावंत/कलाकार या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top