{सुंदर निबंध} माझा आवडता छंद निबंध मराठी | maza avadta chand nibandh marathi

maza avadta chand nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता छंद या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

माझा आवडता छंद निबंध मराठी | maza avadta chand marathi nibandh

 

एखादी गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा करायला आवडत असते. ती गोष्ट करत असताना आपल्याला आनंद मिळतो. हळू हळू आपल्या आवडीचे रूपांतर छंदामध्ये होते. एखादी गोष्ट जी आपण न थकता तासंतास करू शकतो. आपल्या छंदामुळे आपल्याला आत्मविश्वास येतो. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. प्रत्येकाचा छंद हा वेगळा असतो.

कोणाला गायन आवडते, कोणाला खेळायला आवडते, कोणाला चित्रकला आवडते, कोणाला भटकंती करायला आवडते तर कोणाला वाचन करायला आवडते. आपला भरपूर वेळ हा कामात जातो. कामातून मिळालेल्या वेळेतून खूप जण आपला छंद जोपासत असतात. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या छंदातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

माझा छंद हा थोडासा वेगळा आहे. माझा आवडता छंद आहे भटकंती करण्याचा.

मला लहानपणापासून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याची खूप आवड होती. मला पुस्तक वाचनाचीही आवड असल्यामुळे मला त्या वाचनातूनही अनेक ठिकाणांची माहिती मिळत होती. त्या पुस्तकांमधील माहिती वाचून, त्या ठिकणांनाचे केलेले वर्णन पाहून मला त्या ठिकाणांना भेट देण्याची ओढ लागत असे.

👉घड्याळ नसते तर मराठी निबंध हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शालेय सहलींमधून  भरपूर ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिल्यामुळे मला नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याची आतुरता असायची. पहिल्यांदा मी शालेय सहलींमधून निसर्गरम्य स्थळांना भेटी देऊ लागलो. शालेय जीवनात किल्ले सिंहगड ला दिलेली भेट मी कधीही विसरू शकणार नाही.

मला खूप आधीपासूनच निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असे. भटकंती करत असताना काही मित्र मला मिळाले.

आम्ही सर्वजण एकत्र येऊन ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊ लागलो. आम्ही पहिल्यांदा गडकिल्ल्यांना भेटी देण्यास सुरुवात केली. भटकंती करत असताना मी नकळत निसर्गाच्या खूप जवळ गेलो. पूर्णवेळ भटकंती करणे शक्य नसल्याने सुरवातीला सुट्टीच्या वेळेत मी जवळपासच्या किल्ल्यांना जायला व तिथला इतिहास जाणून घेण्यास सुरुवात केली. मला माझा हा छंद जोपासण्यासाठी जास्त गोष्टींची गरज पडली नाही. मला माझा हा छंद जोपासण्यासाठी ट्रेकिंग शूज, पाण्याची बॉटल या गोष्टींची आवश्यकता होती.

भटकंती करण्यामुळे कोणते फायदे होतात याचीही मी पूर्ण माहिती मिळवली होती. माझ्या हा छंद मला निरोगी राहण्यास नेमही मदत करतो. भटकंती करत असताना आपण निसर्गातील भरपूर गोष्टी पाहत असतो अनुभवत असतो.

माझा आवडता छंद निबंध मराठी | maza avadta chand marathi nibandh

निसर्गातील सौंदर्य आपल्याला खूप जवळून पहायला व अनुभवायला मिळाले.  एखाद्या उंच डोंगरावरून सूर्योदय व सूर्यास्त  पाहण्याची मज्जा, गडकिल्ले सर करत असताना एकमेकांना केलेली मदत, उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे, धुक्यांमध्ये दडलेले डोंगर, पक्ष्यांचा कानावर पडणारा छान छान आवाज हे सुख मला माझ्या छंदातून अनुभवता आले.

वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असताना माझ्यासारखीच भटकंतीची आवड असणारे अनेक सवंगडी मला भेटले. माझ्या या छंदामुळे मला खूप गोष्टींची माहिती मिळाली. वेगवेगळे पक्षी, प्राणी मला पाहायला मिळाले. वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती मला मिळत राहिली. माझ्या या छंदामुळे मला निसर्गाचा अद्भुत खजिना पाहायला मिळाला.

मला माझ्या वाटेत अनेक पर्यावरण प्रेमी भेटले. मला त्यांच्याकडून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती मिळाली.

मला शाळेत असताना एक वृक्ष भेट म्हणून मिळाले होते. मी त्याचे पालन पोषण करून त्याला मोठे केले व तेच झाड  आम्हा सर्वांना खूप फळे, सावली देत आहे. तेव्हापासून मी ज्या ठिकाणी भेट देईल त्या ठिकाणी एक तरी वृक्ष लावेन असे मनाशी ठरवले होते.

माझा हा छंद जोपासत असताना मला कडक उन्हाळा, जोरदार पाऊस, कडकडीत थंडी यांच्याशीही मैत्री करावी लागली. निसर्गाची ही वेगवेगळी रूपे मला फक्त माझ्या भटकंतीच्या छंदातूनच पहायला मिळाली. भटकंती करत असताना मला वेगवेगळे अनुभव मिळाले.

मला काही अडचण आली तर लगेच मदत करणारे माझे मित्र मला खूप जवळचे भासतात. भटकंतीमुळे मला नेहमी आत्मविश्वास मिळतो. भटकंती करताना आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटत असतात. एखादी गोष्टी कागदावर पाहण्यापेक्षा ती त्या ठिकानी भेट देऊन अनुभवायला मला खूप आवडते.

माझ्या या छंदामुळे मी खूप सारी माहिती एकत्रित करू शकलो. अनके ऐतिहासिक स्थळांची सद्यस्थिती मला पाहता आली. माझा हा छंद जोपासत असताना मला मिळणारा आनंद हा  अगणित असतो. अनेक ठिकाणांना भेट दिल्यामुळे तिथली माहिती मिळते व माझ्या आरोग्यही नीट राहते त्यामुळे माझा हा छंद मी आयुष्यभर जपणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “माझा आवडता छंद निबंध मराठी | maza avadta chand marathi nibandh” हा निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ माझा आवडता छंद या निबंधाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.  वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment