माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध | maza adarsh shikshak nibandh marathi

maza adarsh shikshak nibandh marathi: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून माझे आदर्श शिक्षक हा निबंध मराठी मधून पाहणार आहोत.

आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. आपले आईवडील आपल्याला चांगले संस्कार लावतात. या स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी पालक मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतात.

चांगले शिक्षण घेऊन आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. आपल्याला जर चांगले शिक्षण आणि संस्कार मिळाले नाही तर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. शाळेतील शिक्षक आपल्याला चांगले संस्कार देतात. भरपूर गोष्टी आपल्याला शालेय जीवनात आपल्या शिक्षकांकडून शिकायला मिळतात.

शिक्षणामुळे आपल्यामध्ये परिवर्तन घडते. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर शिक्षण खूप महत्वाचे आहे. आपल्या आईवडिलांसारखेच आपल्याला वळण, संस्कार लावण्याचे काम शिक्षक करत असतात. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध | maza adarsh shikshak nibandh marathi

 

आमच्या शाळेतील सर्वच शिक्षक अतिशय हुशार आणि प्रेमळ आहेत. सर्व शिक्षक आम्हाला भरपूर ज्ञान देतात.

माझ्या शाळेतील रणपिसे सर हे माझे आदर्श शिक्षक आहेत. मी इयत्ता सातवीमध्ये असताना सर दुसऱ्या शाळेतून बदली होऊन आमच्या शाळेमध्ये आले. पहिल्यांदा आम्हाला सर कडक स्वभावाचे वाटले परंतु तसे न्हवते. रणपिसे सर स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत.

मला माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीकडून काही शिकायला मिळते त्यांना मी माझे गुरू मानतो. जसे माझे आईवडिल माझे गुरू आहेत तसेच रणपिसे सरांना मी माझे गुरू मानतो. रणपिसे सर आम्हाला गणित विषय शिकवतात. सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे आम्हाला समजून घेण्यास सोपे जाते.

सर शिकवत असताना आम्हा मुलांची मनस्थिती जाणून घेतात. सर कधी वेळ मिळाला की प्रेरणादायी गोष्टी सांगून आमचा आत्मविश्वास वाढवतात. सर कधी कधी आम्हाला गोष्टीही सांगतात.

👉पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

सर जसे प्रेमळ आहेत तसेच शिस्तप्रिय सुद्धा आहेत. सर वेळेला खूप महत्व देणारे असल्यामुळे आम्हालासुद्धा वेळेचे महत्व समजले. घरचा अभ्यास नाही झाला तर सर छडी सुद्धा देतात. सरांचा छडी देण्यामागचा उद्देश एकच विद्यार्थ्यांचा विकास.

सरांचा सर्व विद्यार्थ्यांसोबत एकसारखा व्यवहार असतो. सरांनी कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही त्यामुळे सरांबद्दल मला नेहमी आदर वाटतो. मला तर सरांचा तास कधी येतोय असे वाटते. सर शिकवताना आमच्या मनातील शंकासुद्धा दूर करत असतात. परीक्षेची तयारी करण्यासाठी सर सर्व सराव परीक्षा घेतात.

शिक्षणासोबत सर आम्हाला आमच्या भवितव्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे सुद्धा सांगत असतात.

वर्गामध्ये गणित विषय शिकवत असताना सर आम्हाला अनेक यशस्वी लोकांनी त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी घेतलेले श्रम सांगत असतात.

माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध | maza adarsh shikshak nibandh marathi

कोरोना काळात तर शाळा बंद होत्या. आम्हाला शाळेत जाऊन शिक्षण घेणे शक्य न्हवते. कोरोना काळात सरांनी आम्हाला वेगवेगळ्या ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.

सरांमुळे आमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. वर्गातील कोणत्या विद्यार्थ्यांकडे कधी परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नसतील तर सर नेहमी मदत करतात. सर आमच्यासोबत एकदम मित्रासारखे वागतात. एखादी गोष्ट समजली नसेन तर ती गोष्ट वर्गामध्ये सरांना विचारायला भीती वाटत नाही.

गणित विषयासोबत सर क्रीडाशिक्षक सुद्धा आहेत. सर नेहमी खेळांचे महत्व आम्हाला सांगत असतात. खेळ आपल्या जीवनात का गरजेचे आहेत हे नेहमी पटवून देत असतात. सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यंदाच्या वर्षी शालेय क्रिकेट स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. सर मुलांना नेहमी खेळांसाठी प्रेरित करतात.

शाळेतील सर्व कार्यक्रमात सरांचा खूप मोलाचा वाटा असतो. २६ जानेवारी, १५ ऑगेस्ट हे कार्यक्रम जवळ आले की सर ५ ते ६ दिवस आधीच आमची तयारी करून घेत असतात.

सर अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आहेत. शाळेतील सर्व कामे सर अतिशय जबाबदारीने करत असतात. कोणता विद्यार्थी आजारी असेन तर स्वतः सर घरच्यांशी विचारपूस करतात. शाळा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सर मुलांची काळजी घेतात.

सरांचे शाळेतील स्वछतेकडे खूप लक्ष असते. सर स्वतः आमच्यासोबत शाळेची स्वछता करतात. स्वच्छतेसाठी सर छोटे छोटे उपक्रम घेत असतात. शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सरांचे नेहमी प्रयत्न चालू असतात.

मी जेव्हा शाळा संपल्यानंतर या स्पर्धात्मक जगात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करेन तेव्हा सरांचे हे मार्गदर्शन माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मला मदत करेन. माझे आईवडील मला नेहमी सांगत असतात आपण जीवनाच्या वाटेवर नेहमी काही न काही शिकत असतो.

शिक्षण कधीच थांबत नाही परंतु यापुढेही मला रणपिसे सरांसारखे प्रेमळ सर भेटतील का? ते मला समजून सांगतील का ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येतात. अशा आमच्या प्रेमळ, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक सरांना मी कधीच विसरणार नाही. सरांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते माझे आदर्श शिक्षक आहेत.

मित्रांनो, आम्ही आशा करतो की “माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध | maza adarsh shikshak nibandh marathi” निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू…

Leave a Comment