{ सुंदर निबंध } मातृभाषेचे महत्व निबंध मराठी | matrubhasheche mahatva marathi nibandh

matrubhasheche mahatva marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण मातृभाषेचे महत्व या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आपल्या जीवनात मातृभाषेचे महत्व काय आहे? भाषा म्हणजे काय? दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या मातृभाषेचा उपयोग आपल्याला कशाप्रकारे होतो? आपल्या विकासासाठी मातृभाषेची काय भूमिका असते? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

matrubhasheche mahatva marathi nibandh
matrubhasheche mahatva marathi nibandh

मातृभाषेचे महत्व निबंध मराठी

आपण आपल्या जन्मापासून ज्या भाषेचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो ती आपली मातृभाषा असते.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपली मातृभाषा ही आपली ओळख असते.

लहान मुलाच्या कानावर जन्मल्यापासून मातृभाषाच पडत असते. त्यामुळे पहिल्यांदा मूल हे मातृभाषेतून बोलायला शिकते.

आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा जी भाषा प्रथम शिकतो ती आपली मातृभाषा असते. आपल्या कुटुंबात दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी भाषा हीच मातृभाषा असते.

मुलांचा सर्वांगीण विकास हा मातृभाषेतूनच होते असतो.

भाषा म्हणजे काय?

आपल्या सर्वांना भाषा म्हणजे काय हे माहीत आहेच. लहान मुलाला विचारले भाषा म्हणजे काय तरीही तो आपल्याला सांगू शकतो.

भाषा ही आपले विचार इतरांना पटवून देण्याचा व इतरांचे विचार समजून घेण्याची व आपल्या मनातील विचार समर्थपणे मांडण्याचे माध्यम आहे.

आपण आपले विचार, आपल्या मनातील भावना व आपले मत आपल्या मातृभाषेतून खूप प्रभावीपणे इतरांसमोर मांडू शकतो.

सर्वांनी आपल्या मातृभाषेचा उपगोय आपल्या जीवनात केला पाहिजे.“मातृभाषेचे महत्व निबंध मराठी”

जास्तीत जास्त भाषा आपल्याला अवगत असणे कधीही चांगलेच.परंतु आपल्या मातृभाषेचा विसर आपल्यावर पडला नाही पाहिजे.

आपण जेव्हा लहानपणी बोलायला शिकत असतो तेव्हा मुखातून काढलेला शब्द हा आपल्या मातृभाषेतूनच असतो.

आपली मातृभाषाही आपली संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत असते.matrubhasheche mahatva nibandh marathi

भाषेच्या माध्यमातून आपण स्वतःच्या मनातील गोष्टी इतरांनजवळ व्यक्त करतो. याच भाषेचा उपयोग करून आपण स्वप्ने पाहतो.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – मराठी भाषेचे महत्व 

आपण मातृभाषेतून आपले मुद्दे जेवढे प्रभावीपणे व व्यवस्थितपणे मांडू शकतो तेवढे इतर भाषांतून मांडू शकत नाही. विकासाच्या अनेक वाट मातृभाषेतूनच सापडतात.

आपले आईवडील आपल्याला जे संस्कार लावतात, ज्या गोष्टी शिकवतात त्या मातृभाषेतून असतात त्यामुळे त्या गोष्टी शिकायला व समजून घेण्यासाठी सोप्या असतात.

मातृभाषेतून घेतलेले ज्ञान हे आपल्याला जन्मभर साथ देत असते. त्यामुळे आपल्या मातृभाषचा विसर पडला नाही पाहिजे. आपली मातृभाषा सदैव आपल्या लक्षात राहिली पाहिजे.

आपण जेव्हा अनोळखी ठिकाणी जातो तेव्हा तिथली भाषा थोडीशी वेगळी असते. आपल्याला त्यांचे बोलणे समजायला अवघड जाते. परंतु त्या अनोळखी ठिकाणी आपल्या जवळच्या कोणी व्यक्ती असेन तर आपल्याला खुप बरे वाटते हेच भाषेचे महत्व आहे.

matrubhasheche mahatva marathi nibandh
matrubhasheche mahatva marathi nibandh

२७ फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रत्येक राज्याची आपली एक मातृभाषा असते.

मराठी भाषा ही आपल्याला आईसारखीच प्रिय आहे म्हणून मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहे.

मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा आहे. आपल्या भारत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते.

matrubhasheche mahatva nibandh marathi

मातृभाषेचे महत्व निबंध मराठी-माझी मराठी भाषा ही मला प्रिय आहे. मराठी भाषा महाराष्ट्राची मायबोली आहे.

माझ्या मराठीची बोलू कौतुके

परी अमृतातेही पैजा जिंके |

ऐसी अक्षरे रसिका मेळविन ||

अशा सुंदर शब्दात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे कौतुक केले आहे.

मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे.

कवींनी भरपूर कवितांमधून, लेखांमधून मराठी भाषेचे महत्व लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अनके संतांनी मराठी भाषेचा वापर आपल्या जीवनामध्ये केला. अनेक ग्रंथ, भारुडे ही मराठी भाषेमधून लिहिली गेली आहेत.

१३ व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवतगीतेवर मराठीत “ज्ञानेश्वरी” ग्रंथ लिहिला.

संत एकनाथ महाराज यांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली व ग्रंथांची भर मराठी साहित्यात घातली.

अनेक संतांनी लिहिलेले ग्रंथ त्यांनतर अनेक विचारवंतांनी लिहिलेले लेख, कवींनी लिहिलेल्या सुंदर कविता या सर्वामुळे मराठी भाषेत आमूलाग्र बदल घडत गेले.

आपल्या मराठी भाषेत अनेक संतांनी ग्रंथ लिहून ठेवले आहेत, भरपूर ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध आहे मग आपण ज्ञान मिळवण्यासाठी इतर भाषांचा उपयोग का करावा असे मराठी भाषेतील आद्यकवी शंकराचार्य यांनी मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे.

दुसर्यांना आपल्या भाषेविषयी आकर्षण वाटावे यासाठी आपल्याला आपल्या भाषेचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा लागेल.

आपली मातृभाषा आपल्याला बिनचूक व व्यवस्थितपणे बोलता आली पाहिजे व समोरच्याला आपले मुद्दे पटवून देता आले पाहिजेत.

ज्ञानेश्वरी, पसायदान, मनाचे श्लोक, अनेक लेखकांनी लिहून ठेवलेले लेख, कवींच्या कविता हे मराठी साहित्यकरांनी दिलेले अमूल्य ज्ञान याबद्दल मुलांना माहिती दिली तर हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे  जाईल.

भाषेचा उपयोग हा शालेय जीवनात तसेच जीवन जगत असताना खूप ठिकाणी होतो. व्यवहारात भाषेचा उपयोग होतो. शालेय जीवनात निबंध लेखनात, भाषण करत असताना भाषेचा उपयोग होतो.

marathi bhasheche mahatva| मराठी भाषेचे महत्व

मातृभाषेचे महत्व हे जगातील सर्वांनाच माहीत आहे. जगातील कोणतीही व्यक्ती इतर भाषांच्या तुलनेत आपल्या मातृभाषेत खूप चांगल्याप्रकारे व्यक्त होऊ शकतो.

आपल्या मातृभाषेतून  प्राप्त केलेले ज्ञान हे आपण जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो याची साक्ष जगभरातील शिक्षकतज्ञ देत आहेत.

मोठमोठ्या शिक्षणतज्ञांनी त्यांच्या अभ्यासातून सांगितले आहे की ज्ञान मिळवण्यासाठी आपली मातृभाषा उत्तम आहे.

आपल्याला या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मातृभाषेसोबतच इतर भाषांचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. परंतु आपली भाषा आपली ओळख आहे तिचाही वापर झाला पाहिजे.

आपल्या भावना, आपले विचार इतरांना पटवून देण्यासाठी मातृभाषाच उत्तम. थोर समाजसुधारक, लेखक, कवी यांनी आपल्या जीवनात मातृभाषेचा उपयोग केला व आपल्यासाठी अमूल्य ज्ञान दिले आहे.

पालक आपला मुलगा या स्पर्धात्मक जगात टिकावा म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देतात.

मातृभाषेसोबतच इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असले तरीही आपल्या मातृभाषेचे महत्व काम व्हायला नको यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

आपली मातृभाषा किती सुंदर आहे हेही पालकांनी आपल्या मुलांना पटवून दिले पाहिजे. आपल्या मुलांना आपल्या मराठी भाषेत असलेल्या साहित्याची ओळख करून दिली पाहिजे.

आपल्या मातृभाषेत ज्ञानाचा खूप मोठा ठेवा आहे.आपण आपल्या मातृभाषेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात केला पाहिजे.

आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे मराठी बोलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो

आपल्या मातृभाषेचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.

आपल्या मातृभाषेची गोडी सर्वांना लावावी म्हणून आपण सदैव प्रयत्नशील राहायला हवे.

तर मित्रांनो तुम्हाला “matrubhasha che mahatva marathi nibandh”  ( मातृभाषेचे महत्व )हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मातृभाषेचे महत्व या निबंधाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top