Marathi Bhasheche Samvardhan Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात मराठी भाषेचे संवर्धन निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
मराठी भाषेचे संवर्धन निबंध | Marathi Bhasheche Samvardhan Nibandh
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे.
मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. आपल्या भारत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे. मराठी भाषा ही जास्त प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये वापरली जाते. गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड या ठिकाणीसुद्धा मराठी भाषा बोलली जाते.
दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात मराठी भाषा बोलली जाते. आपली मराठी भाषाही भारत देशात तर बोलली जातेच त्याचबरोबर फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशातही बोलली जाते.
आपल्या भारत देशातील अनेक लोक शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेरील देशात म्हणजेच दक्षिण आफ्रिका, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड जातात त्यामुळेही मराठी भाषा या देशातही बोलली जाते. मराठी भाषेचा समावेश हा भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत केला आहे.
👉माझा आवडता लेखक कुसुमाग्रज निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन/मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
कविश्रेष्ठ कसुमाग्रज यांचे मराठी भाषेवर नितांत प्रेम होते. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. जगभरातील मराठी भाषककांकडून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषेतील आणि एकूणच भारतीय साहित्यातील ते एक अग्रगण्य साहित्यिक होते. कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. तसेच यांच्या अनेक कविता तरुणांनामध्ये स्फूर्ती निर्माण करतात.
मराठी भाषा संवर्धन काळाची गरज निबंध मराठी | Marathi Bhasha Samvardhan Kalachi Garaj Nibandh Marathi
विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. अक्षरबाग, मराठी माती, प्रवासी पक्षी, किनारा, श्रावण, जीवन लहरी इ. त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत
त्यांच्या “नटसम्राट” या नाटकासाठी त्यांना १९६५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव यांसारख्या अनेक संतांनी मराठी भाषेचा महिमा सांगितला आहे. आपली मराठी भाषा आपणच समृद्ध केली पाहिजे. केवळ आपल्या बोलण्यातून नव्हे, तर आपल्या आचारातून आणि विचारांमधून देखील मराठी भाषा दिसायला हवी.
आत्ताच्या या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इंग्रजी भाषा येणेसुद्धा गरजेचे आहे. आपल्याला मराठी भाषेसोबतच हिंदी, इंग्रजी भाषा अवगत असणेही गरजेचे आहे. इतर भाषा शिकत असताना आपल्या मराठी भाषेचे महत्वसुद्धा टिकून राहणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करण्याची जबाबदारी आता आपली आहे.
मराठी भाषेतील साहित्यसंपदा विपुल आहे. आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी तिचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आपल्या सर्वांचे योगदान फार महत्वाची आहे. लहान मुलांना मराठी भाषेचे महत्व सांगितले पाहिजे.
मुलांना आपल्या मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. आपल्या भाषेचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दरयाखोर्यांतील शिळा.
कवी कुसुमाग्रज यांच्या या ओळी मनामध्ये ठेवूया आणि आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्यापासून सुरवात करूया.
तर मित्रांनो तुम्हाला “मराठी भाषेचे संवर्धन निबंध | Marathi Bhasheche Samvardhan Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ मराठी भाषेचे संवर्धन निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद