मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध | Marathi bhasheche mahatva nibandh in marathi

Marathi bhasheche mahatva nibandh in marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी भाषेचे महत्व या विषयावर निबंध पाहणार आहोत . 

संपूर्ण जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या भाषांचा वापर केला जातो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो. सर्वाना आपल्या भाषेवर प्रेम असते.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरवात करूया,

मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध | Marathi bhasheche mahatva nibandh in marathi

 

मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा आहे.  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कारविजेत कवी, लेखक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच सर्वांचे लाडके कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. साहित्यातील कवी कुसुमाग्रज यांचे मराठी  योगदान हे खूप मोलाचे आहे.

मराठी भाषा दिन  हा देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यादवशी विविध स्पार्धांचे आयोजन केले जाते. मराठी भाषा दिनाला मराठी भाषा गौरव दिन असेही म्हंटले जाते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या या सुंदर ओळ्या ऐकल्या की मराठी भाषा किती सुंदर आहे हे आपल्याला समजते. कवींनी भरपूर कवितांमधून लेखांमधून मराठी भाषेचे महत्व लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण जिथे जन्म घेतो जिथे वास्तव्य करतो ती आपली मातृभाषा असते. त्यातील साहित्य, ग्रंथ, लेख यांच्याशी आपले जवळचे नाते असते. आपण जेव्हा लहानपणी बोलायला शिकत असतो तेव्हा काढलेला पाहिला उद्गार हा आपल्या मातृभाषेतून असतो.

हा निबंधसुद्धा जरूर वाचा – घड्याळ नसते तर मराठी निबंध

मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात बोलली जाते. मराठी भाषेला खूप प्राचीन इतिहास लाभलेला आहे. मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. आपल्या भारत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते.

उत्तर कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू या राज्यातसुद्धा मराठी भाषा बोलली जाते. दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात मराठी भाषेचा वापर केला जातो.

मराठी भाषा ही फिजी, इस्रायल, मॉरिशस या देशातही बोलली जाते. संतांनी मराठी भाषेचा वापर आपल्या जीवनामध्ये केला. अनेक ग्रंथ, भारुडे ही मराठी भाषेमधून लिहिली गेली आहेत.

मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध | Marathi bhasheche mahatva nibandh marathi

 

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

अशा सुंदर शब्दात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचे वर्णन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मराठी मातीचे रक्षण केले. आपण जेव्हा अनोळखी ठिकाणी जातो तेव्हा तिथली भाषा वेगळी असते. आपल्याला त्यांचे बोलणे समजायला अवघड जाते. परंतु त्या अनोळखी ठिकाणी आपल्या जवळच्या कोणी व्यक्ती असेन तर आपल्याला खुप बरे वाटते हेच भाषेचे महत्व आहे.

मराठी ही आपल्या सर्वांची लाडकी भाषा आहे. आताच्या या स्पर्धात्मक जगात आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला मराठी सोबत दुसऱ्या भाषा बोलता येणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचे पालक इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देतात कारण प्रत्येकाला वाटते की आपला मुलगा या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये. परंतु आपली मातृभाषा किती सुंदर आहे हेही त्यांना पटवून दिले पाहिजे. आपल्या मुलांना आपल्या मराठी भाषेत असलेल्या साहित्याची ओळख करून दिली पाहिजे.

आपल्या मराठी भाषेत ज्ञानाचा भरपूर मोठा ठेवा आहे. इतर भाषा शिकत असताना ते आपल्या मराठी भाषेचे अस्तित्वसुद्धा टिकून राहिले पाहिजे.

वेळेनुसार बदलणे गरजेचे आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये आपली संस्कृती जपणेही तितकेच गरजेचे आहे. आपण आपल्या मातृभाषेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात केला पाहिजे.

आपल्याला आपल्या भाषेविषयी प्रेम आणि अभिमान असला पाहिजे. चला तर मित्रांनो आपण आपल्यापासून सुरवात करूया आणि आपली संस्कृती जपुया.

तर मित्रांना तुम्हाला “मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध | Marathi bhasheche mahatva nibandh in marathiहा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ या निबंधा बद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment