mala pankh aste tar marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण मला पंख असते तर या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आकाशात उडणारे पक्षी पाहून, निसर्गाची शोभा वाढवणारे हे पक्षी पाहून आपल्या मनात कधीतरी विचार आला असेन जर मला पंख असते तर म्हणून आम्ही हा निबंध तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मला पंख असते तर मराठी निबंध
आज शाळेतून घरी येत असताना सहज आकाशाकडे माझे लक्ष गेले. आकाशात स्वतंत्रपणे संचार करणारा पक्ष्यांचा थवा पाहून मनात एक कल्पना आली की मला सुद्धा पंख असते तर?
मला पंख असते तर ही कल्पना माझ्या मनात येताच माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. खरच किती छान अनुभव असेल याचा विचार मी करू लागलो.
मला एका गोष्टीचे नेहमी नवल वाटायचे की हे छोटे छोटे पक्षी एवढे सुंदर घरटे कसे बांधत असतील? मी पक्षी झाल्यावर मला हे सर्व काही पाहायला मिळेल.
मला पंख असते तर मी स्वतंत्रपणे आकाशात फेरफटका मारून येईल.‘mala pankh aste tar marathi nibandh’
मला माझ्या पंखाच्या बळावर आसमंतांची सैर करता आली असती.
मी एका झाडावरून दुसऱ्या झाडांवर जाऊन बसलो असतो. वेगवेगळ्या झाडांवरील वेगवेगळी फळे मनसोक्त खाल्ली असती.
मला ही स्वादिष्ट फळे खाण्यासाठी कोणतेही पैसे दयावे लागले नसते.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा – सूर्य मावळला नाही तर
घरी असताना भूक लागली तर एखादा पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो पण मला पंख असते तर मला एखाद्या झाडावरील फळ लगेच खाता आले असते.
मला आधीपासून नैसर्गिक ठिकाणी फिरायला जायला आवडत असे. वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायला आधीपासून आवडते.
जर मला पंख असते तर मी निसर्गाच्या भरपूर जवळ राहिलो असतो.
मला ज्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे शक्य न्हवते त्या त्या ठिकाणांना भेटी देऊन आनंद घेतला असता.
mala pankh aste tar marathi nibandh
मला भटकंती करण्यासाठी कोणत्याही मोटर सायकल, गाडीची गरज लागली नसती.
माझी ही नैसर्गिक सैर विनामूल्य झाली असती. मला कधीही कुठेही जाता आले असते.
लहानपणापासून मला निळेशार आकाश पहायला खूप आवडायचे. मला पंख असते तर मला हा अनुभवसुद्धा घेता येईल.
मनुष्य आपला प्रवास सुखकर करण्यासाठी बसने ये जा करतात. मला जर पंख असते तर एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यासाठी कोणत्याही बसची वाट पाहावी लागली नसती.
खूप साऱ्या गर्दीतून मला प्रवास करावा लागणार नाही. माझ्या पंखांच्या मदतीने मी आकाशात गिरक्या मारत बसलो असतो. “मला पंख असते तर मराठी निबंध”
रस्त्यांवरील खड्डे, अजीबाजूला असलेला कचरा या गोष्टींपासून मी लांब राहिलो असतो.
मला आकाशातून आमचे संपूर्ण गाव पाहता आले असते. मी गावाचे सुंदर दृश्य डोळ्यात सामावून घेतले असते.माझा प्रवास एकदम सुखकर व मजेशीर होईल.
लहानपणापासून मला आकाशातील रंगीत इंद्रधनुष्य पाहायला खूप आवडत असे.
मला जर पंख असते तर मला इंद्रधनुष्य खूप जवळून पाहता आला असता. ढगांची शोभा मला खूप जवळून पाहता अली असती.
जर मला पंख असते तर मी जंगलांमधील सुंदरता खूप जवळून पाहायला मिळाली असती. मला पंख असते तर सर्व कामे सोपी झाली असती.
मला पंख असते तर वेगवेगळ्या झाडांची, पक्ष्यांची, प्राण्यांची माहिती मला मिळेल.
विमानात बसून प्रवास करण्यापेक्षा जास्त आनंद मला मी स्वतःच्या पंखाच्या बळावर आकाशाची सैर करण्यात आला असता.
तहान लागली तर मस्त तळ्यातील स्वछ पाणी पिऊन माझी तहान भागवेन. प्रवास करून कंटाळा आला तर एखाद्या झाडावर निवांत विसावा घेईल.
मला पंख असते तर मी अपघात ग्रस्तांना, नैसर्गिक आपत्तीमध्ये इतरांची मदत करू शकलो असतो.
आपण आपल्या नातेवाईकांशी फोनद्वारे संपर्क साधत असतो.
मला पंख असते तर मी खूप वेळा गावी जाऊन आजी आजोबांना भेटून आलो असतो.
आकाशात उडत असताना माझे अनेक पक्षी मित्र झाले असते. (मला पंख असते तर)
मला पंख फुटले तर मराठी निबंध | mala pankh futle tar
विचार करता करता माझ्या मनात आणखी एक विचार आला की मला पंख असते तर फक्त फायदाच होईल का?
अलीकडे जास्त प्रमाणात वृक्षतोड होत आहे. जंगल नष्ट होत आहेत. वृक्षतोडींमुळे अनेक प्रदूषणाच्या समस्यांचा मनुष्य सामना करत आहे.
वृक्ष कमी होत राहिले तर पक्ष्यांचे जगणे अवघड होऊन जाईल. अन्नासाठी सतत एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करावी लागेल.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांची रचना वेगवेगळी आहे.
कोणाला उंच उडत येते तर कोणाला वेगाने धावत येते. कोणी पाण्यात राहू शकतो तर कोणी जमिनीवर.
माझ्या मनात विचार आला की माझ्याकडे पंख नसले तरी माझ्याकडे बुद्धी आहे. माझ्या बुद्धीचा वापर करून मी खूप कामे अगदी सहज करू शकतो.
मला जाणवले की मला पंख असते तर मला अडचणींचाही सामना करावा लागला असता त्यामुळे मला कितीही कष्ट पडले तरीही मी ते करेन.
आपण मला पंख असते तर ही एक कल्पनाच राहू देऊ.
तर मित्रांनो तुम्हाला “mala pankh aste tar marathi nibandh” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ मला पंख असते तर या निबंधा संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
This article helps them a lot. Thank you for sharing so well
Thanks
Thank you thxx
Thx