लोकमान्य टिळक निबंध मराठी | lokmanya Tilak Marathi Nibandh

lokmanya Tilak Marathi Nibandh

lokmanya Tilak Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात लोकमान्य टिळक हा निबंध पाहणार आहोत.

हा निबंध लिहीत असताना लोकमान्य टिळक यांनी केलेले कार्य, त्यांचे शिक्षण, त्यांचे सामाजिक कार्य, लोकमान्य टिळक यांच्यावर लिहीली गेलेली पुस्तके, त्यांचे प्रारंभिक जीवन यांची माहिती पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

लोकमान्य टिळक निबंध मराठी | lokmanya Tilak Marathi Nibandh

 

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळणारच !”ही घोषणा आपल्या सर्वांना माहीतच आहे. ही सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक .

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते.

👉निसर्ग माझा सोबती मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्रसेनानी, संपादक, लेखक होते. लोकमान्य टिळक हे लहानापासून अत्यंत हुशार होते. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. ते एक महान अभ्यासक होते.(lokmanya Tilak Marathi Nibandh)

लोकमान्य टिळक १६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ते न डगमगता अडचणींचा सामना करत पुढे जात राहिले. १८७१ साली लोकमान्य टिळक यांचा विवाह सत्यभामाबाई (तापीबाई- माहेरचे नाव) यांच्याशी झाला.

पुढे पुण्यामधील डेक्कन महाविद्यालयातुन १८७७ साली पदवी मिळवली व १८७९ मध्ये गव्र्हमेंट लॉ कॉलेज मधून वकिलीचा पदवी मिळवली.“lokmanya Tilak Marathi Nibandh”

डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच लोकमान्य टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीच्या मदतीने यांनी देशकार्याला सुरुवात केली. १८८० मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली

सहकाऱ्यांच्या मदतीने पुढे १८८५ मध्ये लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली व लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

लोकमान्य टिळक निबंध मराठी | bal gangadhar tilak marathi nibandh

शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकमान्य टिळक यांनी पुण्यामधील एका शाळेमध्ये शिक्षक झाले. जनजागृतीसाठी १८८१  मध्ये त्यांनी केशरी व मराठा अशी वृत्तपत्रे काढली. गणेश आगरकर हे केशरीचे संपादक तर लोकमान्य टिळक हे मराठाचे संपादक होते.

लोकमान्य टिळक यांनी लोक एकत्रित यावेत, लोकांमध्ये एकी निर्माण व्हावी या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी जनतेला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.

👉निसर्ग माझा सोबती मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

लोकमान्य टिळक हे एक महान क्रांतिकारक होते त्यांनी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनजागृती केली.

lokmanya Tilak Marathi Nibandh

१८९७ मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात लोकमान्य टिळक यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

१८९६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक केले व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्रप्रेम जागृत केले.

लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेकदा तुरुंगातही जावे लागले. मांडेलच्या तुरुंगात असताना त्यांनी लेखन व वाचन करून ‘गितारहस्य’ नावाचा अतुलनीय ग्रंथ लिहिला. त्यांनी लोककल्यासाठी अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला.

लोकांकडून त्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनजागृती केली व अन्यायाची जनतेला जाणीव करून दिली. १ ऑगेस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक यांचे आजारपणामुळे निधन झाले. पंडित नेहरूं यांना ही बातमी कळताच “भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला” असे उद्गार त्यांनी काढले. लोकमान्य टिळक यांचे कार्य कधीही विसरता येणार नाही.

ते आपल्याला अनेक थोर विचारांचा वारसा देऊन गेले. लोकमान्य टिळक याना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले गेले आहे.

लोकमान्य टिळक यांच्यावर लिहिलेली पुस्तके

  • लोकमान्य टिळक, लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
  • लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
  • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
  • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
चित्रपट

 

  • “लोकमान्य : एक युगपुरुष” (दिग्दर्शक – ओम राऊत)

तर मित्रांनो तुम्हाला “लोकमान्य टिळक निबंध मराठी हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वरील निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या लोकमान्य टिळक निबंध मराठी…. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top