जागतिक महिला दिन निबंध मराठी | jagtik mahila din nibandh marathi

jagtik mahila din nibandh marathi

jagtik mahila din nibandh marathi नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक महिला दिन निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

सर्वप्रथम स्त्रीशक्तीला माझा माझा मनाचा मुजरा आणि आपणा सर्वांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

संपूर्ण जगभरात महिला दिन कधी व कशा प्रकारे साजरा केला जातो? या दिवसाचे महत्व काय आहे?  याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

आम्ही या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

जागतिक महिला दिन निबंध मराठी | jagtik mahila din nibandh marathi

 

दरवर्षी 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

महिलांबद्दल आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो.

या दिवसाला आंतराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन असेही म्हटले जाते.

👉मी सैनिक बोलतोय निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

पहिला महिला दिवस 28 फेब्रुवारी 1909 या दिवशी न्यू यार्क येथे साजरा करण्यात आला असला तरीही आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार जागतिक महिला दिन हा 8 मार्च या दिवशी निश्चित करण्यात आला.

पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद ही १९०७ साली स्टुटगार्ड या ठिकाणी भरली.(जागतिक महिला दिन निबंध मराठी)

पुढे न्यू यार्क मध्ये ८ मार्च १९०८ रोजी वस्त्रोद्योगातील अनेक स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात मिळून ऐतिहासिक निदर्शने करून दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा मागण्या केल्या.

या मागण्यांबरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष प्रौढ स्त्री-पुरुषां अशा सर्वांना मतदानाचा हक्क मिळावा अशीही मागणी करण्यात आली.

जागतिक महिला दिन निबंध मराठी | jagtik mahila din nibandh marathi

महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनके यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक महिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो.

स्त्रियांच्या या कृतीमुळे व स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ  १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या महिला परिषदेत ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा जो ठराव क्लारा ने मांडला, तो पास झाला.

बल्गेरिया आणि रोमानिया या देशांमध्ये हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.”jagtik mahila din nibandh marathi”

आपल्या भारत देशात मुंबई येथे  ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ मध्ये पुण्यामध्ये एक मोर्चा काढण्यात आला.

जागतिक महिला दिन निबंध मराठी

पुढे युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात साजरा होऊ लागला आहे.

स्त्री कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असते. देशाच्या प्रगतीमध्येही स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे.हा दिवस अभिमानाचा दिवस असतो. विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत. अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

👉मी सैनिक बोलतोय निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, माता जिजाऊ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.

दरवर्षी महिला दिन साजरा करत असताना एक थीम बनवली जाते. महिला दिन साजरा करत असताना पहिली थीम ही सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवण्यात आली होती.

जागतिक महिला दिन २०२२ थीम 

 

Gender Equality Today for a Sustainable Tomorrow (सस्टेनेबल उद्यासाठी आज लैंगिक समानता) ही आतंरराष्ट्रीय महिला दिन २०२२ या वर्षासाठी थीम आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या दिनानिमित्त शाळा, कॉलेजमध्येमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

महिला दिनाचे महत्व समजण्यासाठी भाषण, निबंध स्पर्धा,  आयोजित करण्यात येतात.

महिला अनेक समस्यांचा सामना करत आपल्या मुलांना संस्कार लावता असतात. कोरोना काळात स्त्रियांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. कोरोना संकटकाळात केलेले कार्य गौरवास्पद आहे.

महिलांचे हक्क, शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. असा हा महिला दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

Jagtik mahila din nibandh marathi

तर मित्रांनो तुम्हाला जागतिक महिला दिन निबंध मराठी हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वरील निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या जागतिक महिला दिन निबंध मराठी…. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top
Scroll to Top