गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Guru purnima nibandh in marathi

 Guru purnima nibandh in marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुपौर्णिमा निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Guru purnima nibandh in marathi language

गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:

आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये गुरूंचे स्थान खूप महत्वाचे आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ‘23 जुलै’ या दिवशी गुरूपौर्णिमा आहे.

चांगले संस्कार लावण्यासाठी आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. गुरू आणि शिष्य या दोघांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा आहे. आपल्या देशात सर्व सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. गुरु पौर्णिमा संपूर्ण देशभरात खूप भव्यतेने साजरी केली जाते. गुरू पौर्णिमेला शाळा, मठ , मंदिर, आश्रम, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी गुरूंचे पूजन केले जाते.

आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. गुरू या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे. कृष्ण-अर्जुन, द्रोणाचार्य-एकलव्य, रामकृष्ण, परमहंस, विवेकानंद अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहे.

शाळां-कॉलेजमध्ये व इतर क्षेत्रांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात साजरी केली जाते. आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे पूजन करण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस.

गुरु म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप. गुरुपौर्णिमा या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हंटले जाते.

आपल्याला आपल्या आयुष्यात मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे असते. आपल्या गुरूकडून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. आपले आईवडील हे आपले पाहिले गुरू असतात. त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते. आपले आईवडील आपल्यावर चांगले संस्कार लावत असतात.

👉निसर्ग आपला मित्र निबंध मराठी हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

गुरू आपल्याला त्यांच्याजवळअसलेले ज्ञान देत असतात त्यामुळे आपले अज्ञान दूर होते. गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली जाते व त्यांचा आशिर्वाद प्राप्त केला जातो. आपले गुरु आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात. आपले आईवडील आपल्याला चांगले संस्कार लावतात तसेच शाळेतील शिक्षक आपण आयुष्यात प्रगती करण्यासाठी नवनवीन ज्ञान देत असतात.

आपल्या शालेय जीवनामध्ये शाळेतील शिक्षक आपल्याला  योग्य मार्गदर्शन करतात व  आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असणारा सर्व गोष्टींची तयारी अपल्यालाकडून करून घेत असतात.

आपले गुरू हे ईश्वराचे दुसरे रूपच आहेत. आपल्याला आपल्या जीवनप्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या व आपले व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या आपल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहित असताना ‘व्यासांचा मागोवा घेतो’ असे व्यास ऋषींबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. जे आपल्याला नेहमी चांगले संस्कार देतात तसेच नेहमी मार्गदर्शन करतात ते आपले गुरूच आहेत. आपल्याला आपल्या आयुष्यात चांगला गुरू लाभणे खूप गरजेचे असते.

गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Guru purnima nibandh in marathi language

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून एक  सुंदर मडके घडवत असतो. त्याचप्रमाणे गुरु शिष्याला नवनवीन ज्ञान, अनुभव देऊन आपल्याला घडवत असतात.

आपल्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींची माहिती आपल्याला आपल्या गुरूकडून मिळत असतात. आपल्या भारत देशात गुरू शिष्य ही परंपरा फार प्राचीन काळापासुन चालत आलेली आहे. आपले गुरू आपल्याला अज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

आपल्याला येत असलेल्या समस्यांचे निवारण आपण कशा प्रकारे करू शकतो हे आपल्याला आपल्या आईवडिलांनकडून शिकायला मिळते. प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत असतात. आपल्याला आपल्या जीवनात गुरू वेगवेगळ्या रूपात भेटतात. गुरू आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आपण जर त्यांच्या आज्ञेचे पालन केले तर यश मिळवणे  सोपे होऊन जाते.

आपण जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात. अनेक अनुभव आपण घेत असतो. आपल्याला ज्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळत असते गे आपले गुरुच.

जो सपना से नही मिलता है, वो किसी गुरु की दस्तक से मिलता हे, जीवन सूर्य से प्रकाशित होता है, जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है जब साथ सच्चे गुरु का मिलता है. ज्यांच्याकडून आपल्याला काही तरी शिकायला मिळते तसेच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत असते ते आपले गुरुच.

👉निसर्ग आपला मित्र निबंध मराठी हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

आपल्या गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरूपौर्णिमेला गुरूचरणी नतमस्तक होतो. गुरू शिष्याला ज्ञान देऊन शिष्याचे जीवन प्रकाशमय करत असतात. गुरु आणि शिष्य यांचे नाते आजही पवित्र मानले जाते. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे.

आपला शिष्याला मिळणारे यश हीच गुरुचरणी गुरुदक्षिणा ठरेल. आपण जर प्रामाणिकपणे व नम्रपणे आपले गुरू देत असलेले ज्ञान संपादन केले तर ते आपल्याला व्यवस्थितपणे समजू शकते.

आपल्याला आपल्या आयुष्यात मिळणारे यश हे आपल्याला लाभलेल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच.

आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे व नेहमी त्यांच्या आज्ञेचे पालन करायला हवे.  त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा वापर करून जीवनामध्ये आपण आपल्या देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

तर मित्रांनो तुम्हाला “गुरुपौर्णिमा निबंध मराठी | Guru purnima nibandh in marathi language” हा मराठी निबंध  आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू. आम्ही देत असलली माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना share करा.

Leave a Comment