godhadiche atmakathan marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आज आपण गोधडीचे आत्मकथन या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
या निबंधात थोडेफार बदल करून तुम्हाला हवा तसा निबंध तुम्ही बनवू शकता.

गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध
आज कामावरून रूमकडे येताना उशीर झाला. वातावरण खूप थंड झाले होते. सर्वत्र थंडी पडली होती.
मला रूमवर जाण्याची घाई झाली होती. कधी रूमवर जातोय आणि आईने स्वतःच्या हाताने बनवलेली गोधडी अंगावर घेतोय असे झाले होते.
थोडा वेळ प्रवास केल्यानंतर मी रूमवर पोहचलो. जेवण वगैरे आवरून पटकन गोधडीत शिरलो.
गोधडी अंगावर घेतल्यावर खूप बरे वाटले. अंगातील थंडी क्षणात पळून गेली.
आईच्या हातच्या गोधडीची उबच एवढी असते की कितीही थंडी लागली तरी पळून जाते.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा – शाळेचे मनोगत निबंध मराठी
आईने सोबत दिलेल्या गोधडीची अवस्था थोडीशी खराब झाली होती. त्या अवस्थेतसुद्धा गोधडी थंडीपासून माझे रक्षण करत होती. गोधडीत शिरल्यावर खूप छान वाटेल.
तेवढ्यात मला एक आवाज आला. मी इकडे तिकडे पाहिले. पहिल्यांदा मला समजले नाही.पुन्हा मला आवाज आला पण यावेळी मला लगेच समजले.”godhadiche atmakathan marathi nibandh”
गोधडी माझ्याशी बोलत होती. “अरे बाळा मी गोधडी बोलतीये”. थोडा वेळ मी शांतच बसलो.
तुझ्या आईन स्वतःच्या हाताने खूप मेहनत घेऊन मला तुझ्यासाठी बनवून घेतले होते.
मला खूप उबदार, गुबगुबीत आणि सुंदर रूप तुझ्या आईन आईने दिले.
तुला थंडी वाजते तेव्हा तू लगेच मला अंगावर घेतोस. तुझे थंडीपासून रक्षण करताना मला खूप छान वाटते. तुला जेव्हा माझी गरज असते तेव्हा तू माझा वापर करतोस.
आज मला तुला काही सांगावेसे वाटले. मी तुझी नेहमी काळजी घेते परंतु तू माझी काळजी घेतोस का?
godhadiche atmakathan marathi nibandh
तू जेव्हा घरी होता तेव्हा तुझी आई माझी खूप काळजी घायची.
तुझी आई मला ओढ्याच्या खळखळत्या पाण्यात स्वछ धुवून आणायची, माझे धागे उसवले तर आई लगेच शिवून माझी काळजी घायची.
परंतु तुझ्यासोबत इकडे आल्यापासून माझी अवस्था खूप खराब झाली आहे. कितीतरी दिवस झाले मला पाण्याने स्वछ धुतले गेले नाही.
आता हे थंडीचे दिवस संपले की माझा उपयोग नाही होणार. मला घराच्या कोणत्यातरी कोपऱ्यात ठेवण्यात येईल व पुन्हा थंडी अली की माझा वापर होईल.
मी जेवढे दिवस तुझ्यासोबत आहे तेव्हा माझी काळजी घेतली तर मलाही खूप छान वाटेल. तू जर माझी काळजी घेतली तर मी स्वछ आणि सुंदर दिसेल.
गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध – जसे तुझ्या आईने मला जपले तसेच तुही मला जपावं एवढंच. तू आता शांत झोप घे. चल आता जाते मी…
तेव्हा मला जाणवले गोधडी आपल्याला थंडी लागू नये म्हणून नेहमी ऊब देत असते मग आपण पण तिची काळजी घेतली पाहिजे.
सकाळी जाग आल्याबरोबर मी गोधडी स्वछ धुवून घेतली. जिथे जिथे धागे निघाले होते ती जागा नव्याने शिवून घेतली.
तर मित्रांना तुम्हाला “godhadiche atmakathan marathi nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ गोधडीचे आत्मकथन या निबंधा बद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Apratim nibhandha