paryavaran samvardhan kalachi garaj nibandh in marathi


Paryavaran samvardhan kalachi garaj nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धन का गरजेचे आहे? प्रदूषण कमी करणे का गरजेचे आहे? पर्यावरण स्वछ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल माहिती पाहणार आहोत.

आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध या निबंधासंबंधीत काही मुद्दे या निबंधामधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.


पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध | Paryavaran samvardhan kalachigaraj marathi nibandh


प्रत्येकाला निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचा वेळ व्यतीत करायला नेहमी आवडत असतो. सर्वांनाच सुंदर हिरव्यागार निसर्गाचा सहवास हवा असतो.

प्रत्येकालाच निसर्गरम्य ठिकाणी भेटी देऊन तेथील सुंदरतेचा आनंद घ्यायला आवडत असतो. आपल्या आजूबाजूला असलेली ही हिरवीगार झाडे निसर्गाची शोभा वाढवत असतात.

या वृक्षांपासून आपल्याला नेहमी फायदाच होत असतो. आपल्या आजूबाजूला असलेले वृक्ष आपल्याला असंख्य गोष्टी प्रदान करतात. आपल्या आजूबाजूला असणारे हे वृक्ष वातावरणातील कार्बन डाइऑक्साइड  शोषून घेतात व आपल्याला जीवनावश्यक असलेला अक्सिजन प्रदान करतात.

वातावरणातील हवा स्वछ करण्यात वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आपल्याला जिवंत राहण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे.”Paryavaran samvardhan kalachi garaj nibandh Marathi”

हे वृक्ष पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात?असंख्य फायदे आपल्याला या वृक्षांपासून मिळतात तरीही वृक्षतोड होताना आपल्याला दिसत असते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वृक्ष पर्यावरण संतुलन राखण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतात.

जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवा प्रदूषण आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे.

सजीव, निर्जीव म्हणजेच हवा, पाणी,झाडेझुडपे या सर्वांचे मिळून पर्यावरण बनते. नैसर्गिक बदल हे होतच असतात परंतु मानवनिर्मित काही गोष्टींमुळे पर्यावरणामध्ये बदल होताना दिसतात.

प्रदूषणाची समस्या आपल्यासमोर येऊन उभी आहे. आपल्याला जर पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर आपल्याला शक्य होईल तेवढे मानवनिर्मित प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Paryavaran samvardhan kalachi garaj

अनेक अनावश्यक वस्तू नदीच्या पत्रात टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. प्रदूषित पाणी पिल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

प्रदूषित पाणी पिल्यामुळे मनुष्याला त्रास होतोच परंतु त्यासोबतच अनेक जलचर जीवांच्या जिवालाही धोका निर्माण होतो. आपल्या अजूबाजूला असणारे वृक्ष जमिनीची होत असलेली धूप थांबवतात. तसेच वृक्ष हवाही स्वछ करतात.

अलीकडे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इंधन ज्वलनातून अनेक वायू वातावरणात मिसळतात. कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामध्ये अनेक असे वायू असतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

पाण्याची कमतरता, वाढते तापमानवाढ, कमी प्रमाणात पडणारा पाऊस अशा अनेक समस्या आपल्यासमोर उद्भवत आहेत.‘पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध’

वृक्षतोड, वाढते प्रदूषण यामुळे आपल्याला जागतिक तापमान वाढ या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जाऊ लागू शकते.

आपण जर या समस्या रोखण्यासाठी योग्य वेळी प्रयत्न केले नाही तर पुढे आपल्याला या समस्या सोडवणे खूप अवघड होऊन जाईल. पर्यावरण संतुलन व्यवस्थित राहिले तरच आपले जीवनही व्यवस्थित चालेल त्यासाठी आपल्याला प्रदूषण कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पर्यावरण संरक्षण निबंध मराठी

आपल्याला जर पर्यावरण  स्वच्छ ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला प्रदूषण कमी करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. कारखान्यांमधील पाणी नदीच्या पाण्यात न सोडता  त्यासाठी पर्याय शोधला तर मोठ्या प्रमाणात आजारांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

आपल्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी या निसर्गातुनच मिळतात त्यामुळे आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी स्वतः पासून प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे.

निसर्ग आपल्याला देत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा मोबदला घेत नाही. आपण जर पर्यावरणातील गोष्टींचा वापर विचारपुर्वक केला तर पर्यावरण संतुलन व्यवस्थित राहील व आपल्याला कोणत्याही नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

आपणसुद्धा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत. पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीचे संवर्धन करणे ही एक प्रत्येकाची जबाबदारी आहे.

पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढीला स्वछ हवा, स्वछ पाणी  मिळण्यासाठी आपण आतापासून प्रयत्न केले पाहिजेत.

पर्यावरण संवर्धनासाठी आपण कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. शाळांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करावे त्यामुळे मुलांना वृक्षांचे महत्व समजेन व पुढे जाऊन ते वृक्षारोपण करण्याकडे लक्ष देतील.

Paryavarn samvardhan in marathi

जगभरात ५ जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित केले केले जातात. फक्त जागतिक पर्यावरण दिनीच नाही तर इतर वेळीही आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.

पर्यावरणाचा समतोल असाच नीट राहण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुख्य जबाबदारी बनली आहे.

पर्यावरण ऱ्हासाची प्रमुख कारणे कोणती आहेत?

  • वृक्षतोड
  • वाढते प्रदूषण
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो?

आपण छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा पर्यावरण संतुलन नीट ठेवू शकतो.

  • वृक्षतोड न करता वृक्षारोपण करण्याकडे लक्ष द्यावे
  • पर्यावरण संवर्धन का गरजेचे आहे त्याबद्दल शक्य होईल तेवढी लोकांना माहिती दिली पाहिजे.
  • शाळांमध्ये मुलांना वृक्षांचे महत्व काय आहे याबद्दल माहिती  दिली पाहिजे
  • इंधन बचत करावी.
  • नदीपात्रात तसेच इतरत्र कचरा टाकू नये.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने शक्य होईल तेवढी वृक्ष लागवड करावी. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची व आपल्या कुटुंबातील व्यक्तीची काळजी घेतो तशीच आपण निसर्गाचीसुद्धा घेऊया.

तर मित्रांनो तुम्हाला paryavaran samvardhan kalachi garaj nibandh in marathiपर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध )हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.