vasant rutu nibandh in marathi

Vasant rutu nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण वसंत ऋतु या विषयावर  निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

वसंत ऋतु वर मराठी निबंध | vasant rutu nibandh in marathi

 

आपल्या भारत देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा सुंदर उपऋतू आहेत. प्रत्येक ऋतूचे महत्व हे वेगवेगळे आहे. प्रत्येक ऋतूमध्ये वातावरण वेगवेगळे असते. वसंत ऋतू हा खूप सुंदर व सर्वांच्या आवडीचा ऋतू आहे.

हिवाळ्यातील वाढत जाणाऱ्या थंडीचा अनुभव घेऊन व थंड वातावरणाला कंटाळून आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो ती वसंत ऋतूची. उन्हाळ्याच्या सुरवातीला वसंत ऋतू येतो. एकीकडे वातावरणातील थंडीचे प्रमाण कमी होते तर दुसरीकडे उष्ण वातावरण अनुभवायला मिळते.”vasant rutu nibandh in marathi”

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गामुळे आपल्याला छान वाटते. वसंत ऋतू मध्ये निसर्ग खूप सुंदर असतो.

वसंत ऋतू हा आपल्या सर्वांसाठी आनंद घेऊन येतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माघ आणि फाल्गुन या महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते. हिवाळा ऋतूच्या थंड अनुभवानंतर वसंत ऋतू आनंद घेऊन येतो.

सूर्यही वसंत ऋतूचे आगमन होताच त्याची उपस्थिती दाखवण्यास सुरुवात करतो. हिवाळ्यातील थंडी बाजूला सारून वसंत ऋतूमध्ये निसर्गातील अनेक गोष्टी आपले मन वेधून घेतात.

👉वृक्षारोपण मराठी निबंध हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

वसंत ऋतूमध्ये हिवाळ्यातील थंडीपासून सुटका होते. वसंत ऋतू आला की निसर्गात अनेक बदल पाहायला मिळतात. हे बदल पाहून असे वाटते की निसर्ग सांगत असतो की वसंत ऋतू आला आहे. इंग्रजी भाषेत वसंत ऋतूला स्प्रिंग (Spring) असे म्हणतात.

गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, वसंत पंचमी व्रते  यांसारखे सण वसंत ऋतूमध्ये साजरे केले जातात.

{सुंदर निबंध} वसंत ऋतु वर मराठी निबंध | vasant rutu nibandh in marathi

वसंत ऋतूमध्ये पानगळ सरून झाडांना छान पालवी फुटते. झाडांमध्ये, फुलांमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळतो. निसर्ग वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी तयार असतो.

वसंत ऋतूत निसर्गाचे सोंदर्य पाहण्यासारखे असते.

वेगवेगळे वृक्ष फुलू लागतात. वातावरण अगदी स्वछ आणि सुगंधी होऊन जाते. स्वतःच्या सुंदर रूपाने निसर्ग आपल्याला त्याच्याकडे ओढून घेतो.maza avdta rutu nibandh marathi

वसंत ऋतू हा सर्व ऋतूंचा राजा म्हणून ओळखला जातो. निसर्ग इतर वेळी सुंदर असतोच पण वसंत ऋतूमध्ये निसर्गाचे रूप पाहण्यासारखे असते. आपल्या सर्वांनाच निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. वसंत ऋतूमध्ये निसर्गाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.

वसंत ऋतूमध्ये वातावरण अगदी सुखद भासते. निसर्ग हिरवागार होऊन जातो. पक्ष्यांचे छान छान आवाज कानावर पडतात. आपल्या देशातील लेखकांनी, कवींनी, साहित्यकरांनी ऋतूंवर खूप लेखन केलेले आहे.”वसंत ऋतु वर मराठी निबंध”

माझा आवडता ऋतू निबंध मराठी

रामायणात महर्षी वाल्मिकींनी वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ‘ऋतुनां कुसुमाकर:’ असे संबोधले आहे. वसंत ऋतूमध्ये कवींना, लेखकांना कविता लिहिण्यासाठी, लेखन करण्यासाठी नवनवीन कल्पना मिळतात.

सुंदर वातावरणात भटकंती करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. वसंत ऋतूमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. थंडीचे प्रमाण कमी होऊन वातावरण थोडेसे उष्ण होते परंतु जास्त उष्णतासुद्धा मानवी शरीरासाठी योग्य नसते. आपल्याला आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी काही गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते.

वसंत ऋतू हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा ऋतू असतो.“vasant rutu nibandh in marathi”
रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ आपण निसर्गाच्या सानिध्यात घालवला पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात आपण आलो तर ताण कमी होण्यास मदत होते.

आपल्या आजूबाजूला असलेला हा निसर्ग आपल्यात आत्मविश्वास तर निर्माण करतोच त्यासोबतच नवीन कार्य करण्यास आपल्याला प्रोत्साहीत करत असतो.

वसंत ऋतू आपल्याला आनंद, प्रसन्नता, उत्साह देऊन जातो. निसर्ग आपल्याशी न काही बोलता भरपूर गोष्टी शिकवून जातो. निसर्ग खूप सुंदर आहे फक्त आपण थोडासा वेळ काढला तर आपल्याला हे नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येईल.

तर मित्रांनो तुम्हाला “{सुंदर निबंध} वसंत ऋतु वर मराठी निबंध | vasant rutu nibandh in marathi” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वसंत ऋतु या संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. 

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.