corona kalatil shikshan marathi nibandh
corona kalatil shikshan marathi nibandh 

corona kalatil shikshan marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण कोरोना काळातील शिक्षण या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.


कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी | corona kalatil shikshan marathinibandh

 

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. कोरोना व्हायरस या संकटाशी संपूर्ण जग सामना करत आहे. कोरोना विषाणू झपाट्याने वाढत असल्यामुळे ही सर्व परिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी सर्व जगभरात लॉकडाउन सुरू करण्यात आले.

कोरोनाच्या या संकटामुळे आपल्या सर्वांचेच आयुष्य अस्थिर झालेले आहे.  कोरोना संकटाने सर्वानाच  ग्रासून टाकले आहे. कोरोनो विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोरोना साखळी तोडण्यासाठी देशभरात कडक लॉकडाउन करण्यात आले.

कोरोना काळात खूप मोठे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या सारकरने कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. कोरोना काळात आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सगळ्याच क्षेत्रात झाला आहे.

👉पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध वाचण्यासाठी  येथे क्लिक करा 👈

मुलांच्या आरोग्याची काळजी लक्ष्यात घेता शाळा बंद करण्यात आल्या. जगभर पसरलेले हे कोरोना संकट कधी टळेल हे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. कोरोना व्हायरस या संकटाचा सगळ्यात मोठा परिणाम हा शिक्षणावर झाला आहे. कोरोना संकट येण्याच्या आधीचे शिक्षण अतिशय वेगळे होते.

मुलांना सहजपणे शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेता येत होते. मुलांना कोरोनामुळे शाळेत जाऊन शिक्षण घेणे शक्य  होत नाहीये. पालकांनाही मुलांच्या शिक्षणाची काळजी लागलीये.

कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी | corona kalatil shikshan marathinibandh

शाळा बंद असल्यामुळे शिक्षण थांबवून तर चालणार नाही. मुलांचे भवितव्य ही गोष्टसुध्दा खूप महत्त्वाची आहे. मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही तर मग मुले शिक्षण कसे घेणार? पुढील वर्गाचा अभ्यास कसा करणार? शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मुलांना कसे मिळणार ?असे अनेक प्रश्न मुलांसमोर, शिक्षकांसमोर व आपल्या सर्वानाच पडलेले आहेत.”corona kalatil shikshan marathi nibandh”

आपल्या दैनंदिन जीवनात जसे मोठे बदल पाहायला मिळाले तसाच एक बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण. मुलांचे शिक्षण न थांबता तशेच चालू राहणे गरजेचे आहे.

कोरोना संकटाच्या आधी  मुले आपल्याला शाळांमध्ये जाताना दिसत होती परंतु तीच मुले आता आपल्याला मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट यांचा उपगोय करून अभ्यास करताना दिसतात.

शाळा, कॉलेज बंद असताना ऑनलाईन शिक्षण हा चांगला पर्यायी मार्ग आपल्याकडे आहे. कोरोना काळात मुले ऑनलाईन शिक्षण पद्धतीने भरपूर ज्ञान मिळवू शकतात. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.

शाळा बंद असताना मुले शिक्षण मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर  जास्तीत जास्त करू लागली. मुलांना शाळते जाऊन शिक्षकांकडून ज्ञान मिळवणे शक्य नसल्याने शिक्षक या ऑनलाईन पद्धतीने मुलांपर्यंत पोहचू शकले.’कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी’

कोरोना काळात ऑनलाईन वर्ग सुरू करून शिक्षकांनी मुलांना ज्ञान देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षकांना मुलांशी व पालकांशी संपर्क साधने सोपे झाले.

मुलांनी ऑनलाईन पद्धतीने भरपूर ज्ञान मिळवले. मुलांना शिक्षण घेण्यात आनंद वाटू लागला. नवनवीन पद्धतीने मुले ज्ञान मिळवू लागली. ऑनलाईन शिक्षण पद्धतीची एक महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी फक्त घरातील मोबाइलची गरज असते.

कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी | corona kalatil shikshan marathinibandh

खूप कमी वेळात आणि खूप कमी खर्चात मुलांनी चांगले ज्ञान मिळवले. मुलांना शिक्षण घेत असताना काही अडचणीही येत राहतात. काही मुलांना स्वतः अभ्यास करून काही गोष्टी समजून घेणे अवघड जाते तर काही मुले स्वतः समजून घेऊन अभ्यास करू शकतात.

ज्या मुलांना शिक्षण घेताना काही मुद्दे समजत न्हवते त्यांनी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करून शिक्षकांशी संपर्क साधून आपल्याला न समजणारे मुद्दे समजावून घेतले.

शाळा सुरू नसल्यामुळे सर्व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करू लागले. गुगल मीट, झूम यांचा वापर करून मुले शिक्षण मिळवू लागली परंतु यातही खूप मुलांना अडचणी येत होत्या. काही मुलांजवळ मोबाइलची अडचण असते तर काहींना इंटरनेटविषयी अडचण असते. ग्रामीण भागात काही ठिकाणी मोबाईलला रेंजसुद्धा नसते.

ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधने उपलब्ध नसतात परंतु अशा अडचणीतसुद्धा मुलांनी शिक्षण मिळवले. कोरोना काळात काही गोष्टी आव्हानात्मक आहेत. या अडचणींनीवर मात करत मुले शिक्षण घेत आहेत. कोरोना संकट कधी टळेल हे सांगता येणार नाही परंतु मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आपण सर्वांनी एकत्र येऊन मुलांना शिक्षण मिळण्यासाठी काही उपक्रम राबवले पाहिजेत.

तर मित्रांनो तुम्हाला “कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी | corona kalatil shikshan marathinibandh” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ कोरोना काळातील शिक्षण या संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.