shramache mahatva nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण श्रमाचे महत्व या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.
आपण हा निबंध लिहीत असताना श्रमाचे फायदे, दैनंदिनी जीवनात श्रमाचे महत्व, मेहनत केल्यामुळे आरोग्य कसे व्यवस्थित राहू शकते या गोष्टींचा विचार करणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
श्रमाचे महत्व निबंध मराठी | shramache mahatva nibandh in marathi
आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे श्रम करतो त्यापाठीमागे आपला काही ना काही उद्देश असतो. धैर्यप्राप्तीसाठी परिश्रम हा एकमेव मार्ग आहे.
प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये श्रमाचे खूप महत्व आहे. श्रमातून मनुष्य त्याच्या जीवनातील कठीण समस्यांवर सुद्धा मात करू शकतो.
आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला श्रमविना मिळू शकत नाही. श्रमामुळे प्रगतीचा मार्ग उघडू शकतो.
आपल्याला आपल्या आयुष्यात इतरांवर अवलंबून राहायचे नसेन तर स्वतः कष्ट केले पाहिजे.
आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी, धेय्य प्राप्त करण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जी मेहनत घेतो त्याला श्रम म्हणतात.
अनेक थोरपुरुषांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला श्रमाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
श्रम हीच आपल्या यशाची चावी आहे.”shramache mahatva nibandh in marathi”
गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेल्या विचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे तो म्हणजे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
हा निबंधसुद्धा जरूर वाचा – झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध
आपण जर आपल्याला मिळालेल्या या सुंदर आयुष्यात कष्ट न करता आळशी बनून राहिलो तर आपली या समाजात ओळख निर्माण होणार नाही.
आपण जर श्रम घेतले नाही तर भरपूर गोष्टी आपल्यापासून वंचित राहू शकतात.
कष्टाचे महत्व पटवून देताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात-
आधीं कष्ट मग फळ।
कष्टचि नाही तें निर्फळ।
जर आपण कष्ट न करता फळाची अपेक्षा करत असेन तर अशी अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही. जे लोक खूप परिश्रम घेतात यश अशाच लोकांना संधी देते.
आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवायचे असेन तर श्रम करावे लागतील.
मनुष्य दैनंदिन जीवनात जे श्रम करतो ते श्रम वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात.
काही लोक शारीरिक श्रम करतात करतात तर काही लोक बौद्धिक श्रम करतात. मनुष्य या दोन्ही श्रमात मेहनत ही करतोच.
सर्व गोष्टींचा ताळमेळ बसने हे गरजेचे असते. शारिरीक श्रमात शरीराचे तसेच बौद्धिक श्रमही लागतात आणि बौद्धिक श्रमात बुद्धीचे श्रम लागतात.
श्रमाचे महत्व निबंध मराठी | shramache mahatva nibandh in marathi
आपल्या देशात लोकांचा उदरनिर्वाह होण्यासाठी भरपूर कंपन्यांनमध्ये काम करून होतो. आपण या कष्टालाही श्रम म्हणू शकतो.
आपल्याकडे जी कला आहे जे कौशल्य आहे त्याचा उपयोग करून यश मिळवले जाते. हे यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीला आपण श्रम म्हणू शकतो.
आपण आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी, धैय गाठण्यासाठी अविरतपणे मेहनत घेत असतो.
आपले स्वप्न सत्त्यात उतरवण्यासाठी आपण कोठार मेहनत घेत असतो म्हणजेच आपण श्रम करून ते साध्य करतो.
शालेय जीवन जगत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी आपले आईवडील दूर करत असतात. खूप कष्ट करून आपले वडील आपल्याला शिकवतात.
आपण यशस्वी होण्यासाठी आपले आईवडील दिवसरात्र कष्ट करून आपल्याला चांगले आयुष्य देतात. एवढ्या साऱ्या गोष्टी सहज शक्य नसतात. हे सर्व शक्य होते ते त्यांच्या परिश्रमातून.
आताचे युग हे संगणक युग आहे. मानवी जीवन कितीही सुलभ झाले असले तरीही कष्ट करणे गरजेचे आहे. ‘श्रमाचे महत्व निबंध मराठी’
आपला भारत देश विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. बुद्धीच्या बळावर आपण भरपूर शोध लावले आहेत.
मानवी जीवन सुलभ होण्यासाठी भरपूर यंत्रांचा शोध लागला आहे.
आजही शेतकरी शेतात घाम गाळून श्रम करून शेतात पिके घेतो. शेतकऱ्यांच्या या श्रमातून आपल्याला अन्न उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी श्रम करायचे सोडून दिले तर अन्न धान्याचा तुटवडा देशाला भासू शकतो.
आपल्या देशाच्या सीमेवर जवान परिश्रम करतात म्हणून आपण इथे आनंदाने राहू शकतो. पोलीस कर्मचारी दिवसभर सर्व व्यवस्थित राहावे म्हणून कार्य करत असतात. डॉक्टर मेहनत घेतात त्यामुळे कितीतरी जणांचे जीव वाचतात.
आपल्याला आपल्या समाजात जी ओळख असते ती आपल्या कर्तृत्वामुळे आणि आपण हे सर्व मिळवलेले असते ते श्रमातून.
आपण यशस्वी लोक पाहत असतो परंतु त्यांना हे यश सहज मिळालेले नसते. यशस्वी लोकांच्या यशामागे त्यांचे परिश्रम असतात.
श्रमाचे महत्व निबंध मराठी | shramache mahatva nibandh in marathi
पालकांनी मुलांना श्रमाचे महत्त्व लहानपणापासून समजावून सांगितले पाहिजे.
मुलांना श्रमाचे महत्व लवकर समजले तर मुले शाळांमध्ये यश मिळवून पुढील आयुष्यात चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवू शकतात.
मनुष्य आपल्या आयुष्यात जे श्रम करतो ते करत असताना स्वतःची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
जे लोक प्रमाणात शारीरिक श्रम करतात त्यांना जास्त आजारांना सामोरे जावे लागत नाही तसेच बौद्धिक श्रम करणाऱ्या लोकांचीही आहे. “shramache mahatva essay in marathi”
आपण श्रम करताना काळजी घ्यावी की कोणतेही काम प्रमाणात असावे. कोणत्याही काम प्रमाणापेक्षा जास्त झाले तर त्याचे तोटेही असतात.
आपले शारिरीक संतुलन नीट राहणेही महत्वाचे आहे.
आपल्या देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपल्या कामात परिश्रम घेऊन त्यांचे काम करत आहेत. सर्व क्षेत्रात घेत असलेल्या श्रमामुळे आपला देश प्रगती करत आहे.
आपणही आता परिश्रम करूया आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावूया.
तर मित्रांना तुम्हाला “श्रमाचे महत्व निबंध मराठी | shramache mahatva nibandh in marathi” हा मराठी निबंधआवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ मराठी श्रमाचे महत्व या निबंधाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.